चॅट्स- व्हिडिओ बघितले, चुपके-चुपकेवालं अफेअर समजलं; बँकेत मॅनेजर असलेल्या नवऱ्याला बायकोनं तुडव तुडव तुडवलं

Woman Attacks Husband Outside Bank Branch in Badaun: पतीच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीनं शाखेबाहेर नवऱ्याला मारलं. या घटनेचा १५ सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल.
Woman Attacks Husband Outside Bank Branch in Badaun
Woman Attacks Husband Outside Bank Branch in BadaunSaam
Published On

उत्तर प्रदेशातील बरेलीतील बदायूं येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका बँक मॅनेजरच्या पत्नीने तिच्या पतीला शाखेबाहेर बोलावून बेदम मारहाण केली आहे. तिनं आपल्या कुटुंबियांसह पतीला शाखेबाहेर मारहाण केली आहे. दुसऱ्या तरूणीसोबत असलेल्या अनैतिक संबंधातील संशयातून तिनं पतीला मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बिसौली येथील होली चौक येथील एका खासगी बँकेच्या प्रादेशिक शाखेत घडली आहे. धीरेंद्र सिंग पाल असे बँक मॅनेजरचं नाव आहे. तर, त्यांची पत्नी संभलमधील चंदौसी येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. पत्नीनं या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Woman Attacks Husband Outside Bank Branch in Badaun
शिंदेसेनेच्या आमदाराकडून भाजप नेत्याला धमकी; राजकारण तापलं, नेमकं घडलं काय?

बिसौली पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत पत्नीनं म्हटलं की, दोघांचे आठ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. दोघांना २ महिन्यांची मुलगी आहे. तिच्या पतीचे बँक कर्मचाऱ्याशी प्रेमसंबंध सुरू होते. पत्नीला पतीच्या मोबाईल फोनवर चॅट आणि रील सापडले. तिनं पतीला याबाबात जाब विचारला. तसेच हे सर्व बंद करण्यास सांगितले.

परंतु, पतीनं नकार दिला. तसेच खर्चाचे पैसे देणे देखील बंद केले. रागाच्या भरात महिला तिच्या नातेवाईकांसोबत बँकेत गेली. पतीला बँकेच्या शाखेबाहेर बोलावून घेतले. पती बाहेर येताच पत्नी आणि नातेवाईकांनी मिळून पतीला बेदम मारहाण केली. या घटनेचा १५ सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Woman Attacks Husband Outside Bank Branch in Badaun
मध्य प्रदेशातील गुलाबी थंडी, गाव झोपेत अन् छापेमारीचा धडका, पुणे पोलिसांचे "ऑपरेशन उमरती" यशस्वी

बिसौली पोलीस स्टेशनचे प्रभारी हरेंद्र सिंह म्हणाले की, तक्रारीवरून सध्या या घटनेची चौकशी सुरू आहे. जो कुणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं पोलीस अधिकारी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com