Tharala Tar Mag Video : अस्मिताच्या नवऱ्याला अन् साक्षीला रोमान्स करताना अर्जुननं पाहिलं, सुभेदारांच्या घरात मोठं वादळ

Tharala Tar Mag Shocking Promo : 'ठरलं तर मग' मालिकेचा धक्कादायक प्रोमो समोर आला आहे. अर्जुनला अस्मिताच्या नवऱ्याचे अफेअर समजले आहे. मालिकेत धक्कादायक वळण पाहायला मिळणार आहे.
Tharala Tar Mag Shocking Promo
Tharala Tar Mag Videosaam tv
Published On
Summary

'ठरलं तर मग' मालिकेत अस्मिताच्या नवऱ्याला अर्जुन रंगेहाथ पकडतो.

अस्मिताच्या नवऱ्याला अन् साक्षीला रोमान्स करताना अर्जुन पाहतो.

'ठरलं तर मग' मालिकेत नवीन वादळ येणार आहे.

'ठरलं तर मग' मालिकेत रोज नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. मालिका खूपच रंजक वळणावर आली आहे. एकीकडे अर्जुन आणि सायलीला नागराजबद्दल सर्व समजते. तर दुसरीकडे सायलीला प्रियावर संशय येतो. त्यामुळे मालिकेत या दोघांचे भांडे लवकरच फुटणार असल्याचे दिसत आहे. मात्र आता मालिकेत मोठा धमाका झाला आहे.

अखेर अर्जुनला अस्मिताच्या नवऱ्याचे अफेअर समजले आहे. अर्जुनने अस्मिताच्या नवऱ्याला आणि साक्षीला रोमान्स करताना रंगेहाथ पकडताना दिसतो. याचा खास व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामुळे चाहते आता मालिकेसाठी खूपच उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहेत. अस्मिताचा नवरा सचिन हा साक्षीला डेट करत आहे. अस्मिताला वारंवार फसवत आहे. अस्मिता एकदा सचिनला एका मुलीसोबत कॅफेमध्ये पाहते आणि तिला संशय येतो. मात्र नंतर सचिन तिला समजावतो.

सचिन आणि साक्षीला एकत्र पाहताच अर्जुनला मोठा धक्का बसतो. त्याचा राग अनावर होतो. अस्मिता लवकरच सचिनच्या बाळाची आई होणार आहे. आता अर्जुन घरात कोणता राडा घालणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. अस्मिताला सचिनचे सत्य समजल्यावर सुभेदारांच्या घरात मोठे वादळ येणार आहे. त्यामुळे मालिकेचे पुढचे भाग अधिक रंजक असणार आहे. अर्जुन साक्षीला पाठमोरी पाहतो. त्यामुळे सचिनसोबत अफेअर करणारी मुलगी साक्षीच आहे. हे अद्याप अर्जुनला समजले नाही.

अर्जुन घरी येतो. तेव्हा तो अस्वस्थ वाटतो. म्हणतो की, "मी माझ्या बायकोला सोडून इतर कोणत्याही मुलीकडे कधीच पाहत नाही..." हे ऐकताच सर्वजण त्यांच्याकडे आश्चर्याने पाहतात. 'ठरलं तर मग' मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर संध्याकाळी 8.30 वाजता पाहायला मिळते.

Tharala Tar Mag Shocking Promo
Bharti Singh Video : भारती सिंगनं डिलिव्हरीच्या २ दिवसांनी मुलाला घेतलं हातात; पाहताच रडायला लागली, नावही ठेवलंय खास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com