
छोट्या पडद्यावर सध्या 'लग्नानंतर होईलच प्रेम ही' मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेत अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थीकर म्हणजे काव्या ही मुख्य भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. प्रेक्षकांकडून देखील ज्ञानदाला विशेष प्रेम मिळत आहे. नुकतंच ज्ञानदाने सोशल मीडियावर तिच्याविषयीची अपडेट देत चाहत्यांना धक्का दिला आहे.
अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थाकरने पोस्ट शेअर करत प्रकृती ठीक नसल्याची माहिती दिली आहे. ज्ञानदाने हाताला सलाईन लावलेला फोटो शेअर केला आहे. तुम्ही पाहू शकता की, तिचा चेहरा देखील पडला आहे, डोळे बारीक झाले आहेत. तिच्या हाताला सलाईन लावलेली आहे.
पोस्टमध्ये ज्ञानदाने 'मुंबई लोकल'चं प्रमोशन आहे. ज्ञानदा कुठे आहे? मालिकेचे २०० एपिसोड पूर्ण झाले, सेलिब्रेशनमध्ये ज्ञानदा कुठे?तुमची अप्पू, काव्या म्हणजेच ज्ञानदा थोडा आराम करतेय, गेले काही दिवस व्हायरल फिव्हरबरोबर (ताप)माझं भांडण चालू आहे पण, लवकरच परत एकदा नवीन एनर्जी घेऊन तुम्हा सर्वाचं मनोरंजन करायला मी येतेय. तुमचं प्रेम, आशीर्वाद माझ्याबरोबर आणि माझ्या सगळ्या प्रोजेक्टबरोबर कायम ठेवाय याची मला खात्री आहे. 'मुंबई लोकल' हा माझा सिनेमा १ ऑगस्टला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय आणि 'लग्नानंतर होईलच प्रेम'ही मालिका रोज 'स्टार प्रवाह' वाहिनीवर संध्याकाळी सात वाजता नक्की पाहा"
अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थाकर सोशल मीडियावर कायमच तिच्याविषयीच्या अपडेट देत असते. आता तिने तिची तब्येत ठीक नसल्याने ब्रेक घेत असल्याची माहिती दिली आहे. लवकरच ज्ञानदा बरी होईन नव्या जोमाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आगामी काळात ज्ञानदाचा 'मुंबई लोकल' हा चित्रपट देखील रिलीज होणार आहे. ९ ऑगस्टला चित्रपट सिनेमागृहात रिलीज होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.