Tharala Tar Mag: स्टार प्रवाहवर प्रसारित होणाऱ्या लोकप्रिय मराठी टीव्ही मालिका ‘ठरलं तर मग’मध्ये लवकरच एका मोठ्या नाट्यमय वळण पहायला मिळणार आहे. नवीन प्रोमोमध्ये नागराज हा प्रतिमा व रविराज यांच्या २२ वर्षांपूर्वीच्या अपघातासाठी जबाबदार असल्याचे उघड होताना दिसत आहे, यामुळे कथानकात तणाव आणि उत्कंठा आणखी वाढली आहे.
प्रोमोमध्ये दाखवले गेले आहे की, नागराजच्या अचानक दोन दिवस घराबाहेर राहण्याबद्दल सायली आणि अर्जुन प्रश्न विचारतात. त्यावेळी समोर येतं की हे केवळ साधं गैरसमज नाही तर २२ वर्षांपूर्वी घडलेल्या अपघातामागे नागराजचा हात असू शकतो. अपघातामागे महिपत शिखरेचा हात होताच असे सांगितले जात असताना प्रत्यक्षात नागराजच या प्रकरणाशी थेट जोडलेला आहे. त्यानेच महिपतला आपल्या भावाला मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप आहे.
या प्रकरणामुळे सायली आणि अर्जुन यांना मोठा धक्का बसतो आणि पुढे अनेक नवे प्रश्न उभे राहतात. सुमन नागराजची पत्नी हळूहळू आपल्या नवऱ्यावर शंका करु लागली आहे आणि नंतर ती सायली-अर्जुनकडे जाऊन अत्यंत गांभीर्याने सत्य उघड करते. सुमन म्हणते, “२२ वर्षांपूर्वी भावोजी आणि वहिनींचा अपघात… माझा नवरा सुद्धा जबाबदार आहे.” या खुलासानंतर सायली-अर्जुन चकित झालेले दिसतात.
या नवीन ट्विस्टमुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढली आहे. मालिकेतील अनेक संबंध, सत्य आणि खोटेपणा यांचे गुंतागुंतीचे नाते हळूहळू बाहेर येत आहे. आगामी भाग २१ डिसेंबर रोजी रात्री ८:३० वाजता प्रसारित होणार असून प्रेक्षक या मोठ्या खुलास्याचा परिणाम काय असेल हे पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.