Anant Radhika Wedding Best wishes from MS Dhoni Instagram
मनोरंजन बातम्या

Anant- Radhika Wedding : 'बाबा मे तेरी मलिका...', अनंत- राधिकासाठी एम.एस.धोनीची खास पोस्ट; पत्नीची काळजी कशी घ्यायची याचा दिला सल्ला

Anant Radhika Wedding Best wishes from MS Dhoni : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने या नवविवाहित दाम्पत्य अनंत- राधिका यांच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केलेली आहे.

Chetan Bodke

उद्योगपती मुकेश अंबानी यांचे धाकटे पुत्र अनंत अंबानी आणि बिझनेसमन वीरेन मर्चंट यांची कन्या राधिका मर्चंट हे नुकतेच लग्नबंधनात अडकले आहे. १२ जुलैला मुंबईतल्या बीकेसीमधील जियो वर्ल्ड कन्वेंशन कल्चरल सेंटरमध्ये अनंत- आणि राधिका यांनी मोठ्या थाटामाटात हिंदू परंपरेनुसार विवाह बंधनात अडकले. या सोहळ्यासाठी सर्वच क्षेत्रातील महत्त्वाचे मान्यवर उपस्थित होते.

शिवाय, भारतीय क्रिकेट संघातील सर्वच खेळाडूही या लग्न सोहळ्यासाठी उपस्थित होते. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने या नवविवाहित दाम्पत्यासाठी एक खास पोस्ट शेअर केलेली आहे.

एम.एस. धोनीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये, अनंत- राधिका यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. धोनीने एक फोटो शेअर केला असून त्याने सुंदर कॅप्शनही दिलं आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये, राधिकाने धोनीला मिठी मारलेली दिसत आहे. तर धोनीही थोरल्या भावाप्रमाणे तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे. राधिकाच्या चेहेऱ्यावर हसू आणि आनंदाश्रू पाहायला मिळत आहे. शिवाय तिच्या भांगेमध्ये कुंकूही दिसत आहे.

शेअर केलेल्या पोस्टमध्ये, एम.एस. धोनीने अनंत अंबानी यांना राधिकाची कशी काळजी घ्यायची याबाबतचा सल्ला दिला आहे. पोस्टमध्ये एम. एस. धोनीने लिहिले की, " राधिका तुझ्या चेहऱ्यावरील हा आनंद कायमच असाच ठेव. अनंत, कृपया तु तुझ्यासोबत राहणाऱ्या लोकांसोबत जसा प्रेमाने आणि आदराने वागतोस, तसाच तू तिच्यासोबत राहा आणि तिची काळजी घे. तुमचं वैवाहिक जीवन आनंदाने, सुखाने, हास्याने आणि साहसाने भरलेलं असावं. अभिनंदन आणि लवकरच भेटू!" ही पोस्ट शेअर करताना अभिनेत्याने 'बाबा मे तेरी मलिका' हे गाणं लावलं आहे. शिवाय एम.एस. धोनीची पत्नी साक्षी सिंहनेही नवविवाहित दाम्पत्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माजी मुख्यमंत्र्यांच्या चालकाला शिवीगाळ अन् मारहाण; पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा

Maharashtra News Live Update: अन्न व औषध प्रशासनाकडून आंबेगाव व खेड तालुक्यात ५ ठिकाणी धडक कारवाई

Latest Alta Design For Feet: पायांचे सौंदर्य खुलवण्यासाठी ट्राय करा अल्ताचे हे ७ लेटेस्ट डिझाइन्स

Mumbai Pune Expressway Accident: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तिहेरी अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

Mumabi Tourism : गर्दी नाही, गोंधळ नाही; 'येथे' लपलाय अथांग समुद्रकिनारा, जणू मुंबईतला स्वर्गच

SCROLL FOR NEXT