Priya More
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीचे १२ जुलै रोजी राधिका मर्चंटसोबत लग्न झाले.
अनंत अंबानी त्यांच्या ग्रँड वेडिंग आणि वजन कमी करण्याच्या प्रवासामुळे चर्चेत आहे.
खूप कमी लोकांना माहिती आहे की अनंत अंबानी लहानपणापासूनच अस्थमा म्हणजेच दमा नावाच्या आजाराने ग्रस्त आहे.
दमा हा श्वसनासंबंधीचा आजार आहे. ज्यामुळे श्वासनलिका सूज येते आणि त्या अरुंद होतात.
दमामुळे श्वास घेण्यास त्रास होणे, खोकला, छातीत जडपणा जाणवणे यासारख्या समस्या निर्माण होतात.
अनंत अंबानीला लहानपणापासूनच दमा आहे. या आजारावर उपचार करण्यासाठी त्यांना स्टेरॉईड औषध देण्यात आले होते.
स्टेरॉइड्स श्वासनलिकेची सूज आणि जळजळ कमी करण्यास मदत करते. परंतू त्यांचे काही गंभीर दुष्परिणाम आहते. त्यामुळे वजन वाढते आणि भूख वाढते.
२०१६ मध्ये अनंत अंबानीने १८ महिन्यांत १०८ किलो वजन कमी केले होते. अनंतने आपला डाएट अगदी व्यवस्थित फॉलो केला होता.
अनंत दररोज ५ ते ६ तास वर्कआउट करायचा आणि १ किलोमीटर चालायचा. तो प्रोस्टेट फूड आणि जंक फूड खायचा नाही.
अनंत त्याच्या जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्या, मोड आलेले कडधान्ये, दूध आणि चीज यांचा समावेश करत होता.