Ranbir- Raha News : 'उंगली पकड के तूने चलना सिखाया था ना...', रणबीर- राहाच्या क्यूट फोटोने वेधलं लक्ष

Ranbir Kapoor Raha Kapoor News : आलियाने इन्स्टाग्रामवर रणबीरचा आणि राहाचा एक फोटो शेअर केलेला आहे. त्या फोटोमध्ये पाहा आणि रणबीर फिरताना दिसत आहेत.
Ranbir- Raha News : 'उंगली पकड के तूने चलना सिखाया था ना...', रणबीर- राहाच्या क्यूट फोटोने वेधलं लक्ष
Ranbir Kapoor Raha Kapoor NewsSaam Tv

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील एक लोकप्रिय जोडी आहे. आलिया- रणबीर यांच्यासोबत त्यांची लेक राहा सुद्धा चर्चेत राहते. राहाच्या लूकची कायमच सोशल मीडियावर जोरदार होते. राहा संपूर्ण बॉलिवूडपासून ते पापाराझींपर्यंत सर्वांची लाडकी आहे. नुकतंच आलियाने इन्स्टाग्रामवर रणबीरचा आणि राहाचा एक फोटो शेअर केलेला आहे. त्या फोटोमध्ये पाहा आणि रणबीर फिरताना दिसत आहेत.

Ranbir- Raha News : 'उंगली पकड के तूने चलना सिखाया था ना...', रणबीर- राहाच्या क्यूट फोटोने वेधलं लक्ष
Shabana Azmi On Chandu Champion Film : 'चित्रपट पाहताना मला रडू आवरलं नाही'; 'चंदू चॅम्पियन' बघितल्यानंतर शबाना आझमी काय म्हणाली?

आलियाने इन्स्टाग्रामवर लेक राहा आणि रणबीरचा फोटो शेअर केलेला आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये, रणबीर आणि राहा पाठमोरे उभे दिसतात. दोघेही चालताना दिसत आहे. टीशर्ट आणि व्हाईट शॉर्ट हा लूक रणबीरने कॅरी केलेला आहे. तर राहाने येलो कलरचा क्यूट फ्रॉक वेअर केलेला आहे. हा फोटो तिने "कॅप्शनची गरज नाही" असं कॅप्शन तिने दिलेलं आहे.

आलिया- रणबीरने गोंडस राहाचा चेहरा २५ डिसेंबर २०२३ रोजी म्हणजेच ख्रिसमसच्या दिवशी पापाराझींसमोर रिव्हिल केला होता. राहाचा फेस रिव्हिल होताच सोशल मीडियावर तिच्या क्यूटनेसची चर्चा रंगली होती. सध्या सोशल मीडियावर राहाची सर्वाधिक क्रेझ निर्माण झाली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी रणबीरने लेक राहाच्या नावाचा टॅटू काढला होता. टॅटू काढलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामुळे अभिनेत्याचं आपल्या लेकीवर किती प्रेम आहे हे दिसून येतं. रणबीरच्या कामाबद्दल बोलायचं तर, रणबीर सध्या ‘रामायण’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तर आलिया भट्टने निर्मिती केलेला ‘जिगरा’ चित्रपट येत्या सप्टेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Ranbir- Raha News : 'उंगली पकड के तूने चलना सिखाया था ना...', रणबीर- राहाच्या क्यूट फोटोने वेधलं लक्ष
Danka Hari Namacha Teaser : अनिकेत विश्वासराव घेतोय विठूरायाचा शोध, ‘डंका…हरीनामाचा’ टीझर रिलीज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com