Dayaben Will Be Back On TMKOC Show Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dayaben In TMKOC: प्रतीक्षा संपली! दयाबेन पुन्हा पतरणार, 'तारक मेहता' मालिकेची क्रेझ वाढणार

TMKOC Latest Update: अनेकदा सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी दयाबेन पुन्हा परत कधी येणार?, असा प्रश्न उपस्थित केला होता. आता लवकरच प्रेक्षकांना या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे.

Chetan Bodke

Dayaben Will Be Back On TMKOC Show

छोट्या पडद्यावर गेल्या १५ वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन करीत आहे. मालिकेला प्रसारित होऊन १५ वर्ष झाले असले तरी, मालिका नेहमीच टीआरपी चार्टमध्ये अव्वल स्थानी असते. मालिकेतील अनेक कलाकारांनी मालिकेला सोडचिठ्ठी दिली असली तरी, अजूनही मालिकेच्या लोकप्रियतेत कमी झालेली नाही. अनेकदा सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी दयाबेन पुन्हा परत कधी येणार?, असा प्रश्न उपस्थित केला होता. आता लवकरच प्रेक्षकांना या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. (Serial)

मालिकेच्या प्रॉडक्शन हाऊसने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे. या शेअर केलेल्या प्रोमोमध्ये दयाबेन परत येणार असल्याची चर्चा होत आहे. शेअर केलेल्या प्रोमोमध्ये, कोमल भाभी, अंजली, बबीता आणि कोमल भाभी एकत्र बसलेल्या दिसत आहेत. त्यांची, दयाबेन येणार असल्याची चर्चा होत आहे. (Bollywood)

दयाबेनचं स्वागत कशा पद्धतीने करायचे याबद्दलचे प्लॅन होताना दिसत आहे. दयाबेन येणार म्हटल्यावर, सर्वच महिलांच्या चेहऱ्यावर आनंदित दिसत आहेत. गेल्या वर्षापासून मालिकेमध्ये, दयाबेन येणार अशी अनेकदा चर्चा झाली होती. पण नेहमीच ही चर्चा सपशेल अपयशी ठरली होती. (Bollywood News)

आता दयाबेन येणार म्हटल्यावर चाहते सुद्धा आनंदित झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर दयाबेनच्या येण्याने मालिकेची जोरदार चर्चा होत आहे. सध्या मालिकेमध्ये दिवाळीचा सीन सुरु आहे. मालिकेमध्ये निर्मात्यांना दयाबेनला दिवाळीच्या शुभमुहूर्तावर आणायचे आहे, अशी चर्चा होत आहे. यावेळी सर्वांच्याच चेहेऱ्यावर आनंदाचे वातावरण आहे. आता दयाबेन आल्यानंतर मालिकेमध्ये किती धमाल मस्ती होणार, हे आपल्याला तेव्हाच कळेल.

(Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)

दरम्यान, गेल्या वर्षी निर्मात्यांनी मालिकेच्या कथानकावर कार्टून सीरिज काढली होती. त्यासोबतच 'रन जेठा रन' नावाचा गेमही लाँच केला होता. कार्टून सीरिज आणि गेमला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर काही दिवसांपूर्वी निर्माते असित कुमार मोदी यांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ युनिव्हर्स करणार असल्याचे सांगितले. आता मालिकेचा चित्रपट कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार?, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाला राशीनुसार करा 'हे' खास उपाय; पाहा तुमच्या राशीप्रमाणे काय केलं पाहिजे?

Samsung Galaxy S25 FE 5G मोबाईल लाँच, अपग्रेडेड बॅटरीसह जाणून घ्या खास फिचर्स आणि किंमत

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Almond Jaggery Puran Poli Recipe : वाटीभर बदाम अन्...; गणपतीसाठी बनवा मऊ- लुसलुशीत पुरणपोळी

Maharashtra Live News Update: मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस, सखल भागात पाणी साचायला सुरुवात

SCROLL FOR NEXT