Prabhas Salaar Trailer Released On Social Media
Prabhas Salaar Trailer Released On Social MediaYou Tube

Salaar Trailer: बहुप्रतिक्षित 'सालार'चा ट्रेलर रिलीज; प्रभासच्या ॲक्शन सीन्सने चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Prabhas Salaar Official Trailer Released: साऊथ सुपरस्टार प्रभासचा बहुप्रतीक्षित ‘सालार पार्ट 1: सीझफायर’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. २०२३ मधील बहुचर्चित चित्रपटांपैकी एक चित्रपट आहे.
Published on

Prabhas Salaar Trailer Released On Social Media

साऊथ सुपरस्टार प्रभास (Prabhas)चा बहुप्रतीक्षित ‘सालार पार्ट 1: सीझफायर’ (Salaar)चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. २०२३ मधील बहुचर्चित चित्रपटांपैकी एक चित्रपट आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. ट्रेलर प्रदर्शित होताच अवघ्या काही तासातच ट्रेलरला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Prabhas Salaar Trailer Released On Social Media
Sam Bahadur Movie: विकी कौशलचा अभिनय पाहून आनंद महिंद्रा भारावले; 'सॅम बहादूर' पाहिल्यानंतर केली खास पोस्ट

या ॲक्शन थ्रिलर चित्रपटामध्ये, प्रभासच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. चित्रपटातील ग्राफिक्स, ॲक्शन सीन्सने साऱ्यांचेच लक्ष वेधले आहे. ‘केजीएफ’चे दिग्दर्शक प्रशांत नील आणि ‘बाहुबली’ फेम प्रभास पहिल्यांदाच एकत्र दिसणार असल्यामुळे चित्रपटाबद्दलची हाईप चांगलीच वाढली आहे.

अनेक हॉलिवूड चित्रपटांनाही हा चित्रपट टक्कर देणार अशी नेटकऱ्यांमध्ये चर्चा आहे. सर्वच कलाकारांच्या अफलातून अभिनयाने चित्रपटाला चार चाँद लावले. प्रभाससोबत पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन आणि जगपती बाबू या कलाकारांनी चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. (Tollywood)

थोडक्यात ट्रेलरविषयी सांगायचे तर, प्रभास एका ॲक्शन भूमिकेत दिसत आहे. एका शहरासाठीची आणि राजकीय अस्तित्वासाठीची लढाई ट्रेलरमध्ये दिसत आहे. ट्रेलरमध्ये सुरुवातीला प्रभास पहिले कुठेही दिसत नाही. त्याच्या एन्ट्रीने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. चित्रपट येत्या २२ डिसेंबरला प्रदर्शित होणार असून या चित्रपटासोबत शाहरुखचा ‘डंकी’ सुद्धा रिलीज होणार आहे. या दोघांमध्ये सर्वाधिक कमाई कोण करणार? बॉक्स ऑफिसवर आपले स्थान कोण कायम ठेवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (Bollywood Film)

Prabhas Salaar Trailer Released On Social Media
Animal Vs Sam Bahadur: ‘अ‍ॅनिमल’ की ‘सॅम बहादुर’; पहिल्या दिवशी कोणत्या चित्रपटाची घसघशीत कमाई?, वाचा सविस्तर...

‘सालार पार्ट 1: सीझफायर’ तेलुगू, कन्नड, मल्याळम, तमिळ आणि हिंदी या पाच भाषांमध्ये २२ डिसेंबरला जगभरातील थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. प्रभास शेवटचा ‘आदिपुरुष’मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली इतकी खास जादू दाखवण्यात कुठे तरी अपयशी ठरला. ‘आदिपुरुष’नंतर प्रभाससाठी ‘सालार पार्ट 1: सीझफायर’हा चित्रपट खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. आता या चित्रपटातून प्रभासला किती यश मिळते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Entertainment News)

Prabhas Salaar Trailer Released On Social Media
Boman Irani Birthday: फोटोग्राफर ते बॉलिवूड अभिनेता, बोमन ईराणींना कशी मिळाली अभिनयाची ग्लॅमरस वाट?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com