KGF chapter 2
KGF chapter 2saam tv

KGF Chapter 2 : संजय दत्त, रविना टंडनबाबत शंका होती; दिग्दर्शक नील म्हणाले...

Published on

kGF म्हणजेच कोलार गोल्ड फिल्ड्स (Kolar Gold Fields Movie) सिनेमाचा पहिला चाप्टर २१ डिसेंबर २०१८ ला सिनेमागृहात प्रदर्शीत झाला अन् लाखो सिनेप्रमींच्या गळ्यातील ताईतच बनला. प्रशांत नील (Prashant Nil) दिग्दर्शीत केजीएफ सिनेमात मुख्य भूमिकेत असलेल्या यश (Yash) आणि श्रीनिधी शेट्टीसह (srinidhi shetty) इतर कलाकारांनी अप्रतिम अभिनय करुन चाहत्यांच्या मनावर अधिराज्य केलं. हा सिनेमा त्यावेळी बॉक्सऑफिवर प्रचंड गाजला. त्यावेळी सिनेमाचा क्लायमॅक्स पाहिल्यानंतर केजीएफच्या लाखो चाहत्यांना आस लागली ती KGF चाप्टर टू ची. कोरोनाच्या माहामारीची झळ सोसत तीन वर्षानंतर अखेर १४ एप्रिलला केजीएफ चाफ्टर २ प्रदर्शीत (KGF chapter 2) झाला. त्यानंतर या सिनेमानं जो धुमाकूळ घातलाय तो वाखण्याजोगा आहे, असं म्हटंलं तर काही वावगं ठरणार नाही. कारण पहिल्याच दिवशी या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई (box office collection) करत बाहूबली १, बाहूबली २, वॉर, आरआरआर अशा अनेक चित्रपटांचे विक्रम मोडीत काढले. या सिनेमाच्या फक्त हिंदी व्हर्जनने पहिल्याच दिवशी ५३.९५ कोटींचा गल्ला जमवला आहे. तर सर्व पाच भाषांच्या व्हर्जनमध्ये देशभरात ग्रॉस १३४.९ आणि ११२.९ कोटी रुपयांचं नेट कलेक्शन केलं आहे.

KGF 2 बनवण्याचा प्लॅन नव्हता

सिनेमाचे दिग्ददर्शक प्रशांत नील यांनी एका मुलाखती दरम्यान असं म्हटलंय की, केजीएफ ला दोन चाप्टर मध्ये करण्याच विचार केला नव्हता. त्यावेळी बजेटची समस्या होती. परंतु, केजीएफ चाप्टर टू ची वाढत्या मागणीनुसार, आम्ही सिनेमाच्या बजेटचं विचार करणं सोडलं आणि एका मोठ्या स्केलवर ग्रॅंड कॅनवासवर सिनेमा बनवण्याचं ठरवलं. या सिनेमाला हॉलिवूड सिनेमाचा दर्जा मिळण्यासाठी आम्ही सर्वांनी काबाडकष्ट केले. केजीएफ चाप्टर २ प्रदर्शीत झाल्यानंतर प्रेक्षकांनी दिलेल्या जबदरदस्त प्रतिसादामुंळ आम्हाला सर्वांना खूप आनंद झाला आहे.

संजय दत्त आणि रविना टंडनबाबत शंका होती

केजीएफ 2 च्या कास्टींगची खूप चर्चा होती. सिनेमामध्ये संजय दत्त आणि रविना टंडनही मुख्य भूमिकेत आहेत. यावर बोलताना दिग्दर्शक प्रशांत म्हणतात, मोठ्या स्टार्सला कास्ट करताना मला शंका होती. हिंदी फिल्म इंडस्ट्रीबाबत मला खूप सारं माहिती आहे. पण जेव्हा आम्ही रविना टंडन आणि संजय दत्त यांना कास्ट केलं त्यावेळी मला शंका होती की, आमच्यासोबत काम करताना त्यांच्याकडून कसा प्रतिसाद मिळेल याची काही कल्पन नव्हती. आम्ही सेटवर वेळेला खूप महत्व देतो. त्यामुळे ते दोघे सेटवर वेळेवर येतील की नाही, याबाबतही साशंकता होती. पण ते खूपच प्रोफेशनल आहेत. अशा कलाकारांसोबत मी पहिल्यांदाज काम केलंय. पहिला सिनेमा सुपरहीट झाला होता. त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की मी काहीतरी चांगलचं करेन. त्यांनी स्क्रीप्टवर विश्वास ठेवला आणि सिनेमात उत्तम अभिनय केलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com