Animal Vs Sam Bahadur: ‘अ‍ॅनिमल’ की ‘सॅम बहादुर’; पहिल्या दिवशी कोणत्या चित्रपटाची घसघशीत कमाई?, वाचा सविस्तर...

Animal- Sam Bahadur 1st Day Collection: एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर दोन बिगबजेट चित्रपट रिलीज झाल्यामुळे कोणता चित्रपट सर्वाधिक कमाई करणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. जाणून घेऊया कोणत्या चित्रपटाने सर्वाधिक कमाई केली आहे.
Animal- Sam Bahadur 1st Day Box Office Collection
Animal- Sam Bahadur 1st Day Box Office CollectionSaam Tv
Published On

Animal- Sam Bahadur 1st Day Box Office Collection

काल बॉक्स ऑफिसवर बॉलिवूडचे दोन बिगबजेट चित्रपट रिलीज झाले आहे. रणबीर कपूरचा अ‍ॅनिमल आणि दुसरा विक्की कौशलचा सॅम बहादुर एकाच दिवशी रिलीज झाला आहे. दोन वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर रिलीज झाले आहेत. त्यासोबतच बॉलिवूडचे दोन आघाडीचे हिरो या निमित्ताने एकमेकांसमोर आले आहे.

एकाच दिवशी दोन बिगबजेट चित्रपट रिलीज झाल्यामुळे कोणता चित्रपट सर्वाधिक कमाई करणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. कोणत्या चित्रपटाने ओपनिंग डेला सर्वाधिक कमाई केली आहे, जाणून घेऊया...

Animal- Sam Bahadur 1st Day Box Office Collection
Boman Irani Birthday: फोटोग्राफर ते बॉलिवूड अभिनेता, बोमन ईराणींना कशी मिळाली अभिनयाची ग्लॅमरस वाट?

मेघना गुलजार दिग्दर्शित ‘सॅम बहादुर’ला सोशल मीडियावर प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असला तरी चित्रपटाने पहिल्या दिवशी म्हणावी इतकी खास कमाई केली नाही. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, पहिल्या दिवशी चित्रपटाने ५.५० कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट ५५ कोटींमध्ये निर्मित झाला असून दिग्दर्शकांसह निर्मात्यांनीही चित्रपटासाठी विशेष मेहनत घेतली आहे. भारताचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची कथा आहे. चित्रपटामध्ये विकी कौशल सह फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, नीरज काबी सारखे प्रतिभावान कलाकार चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत आहेत.

Animal- Sam Bahadur 1st Day Box Office Collection
Aparshakti Khurana New Song: 'तेरा नाम सुनके...'; अपारशक्ती खुराणाचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

तर रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ विषयी बोलायचे तर, रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाने पहिल्या खूपच चांगली कमाई केली आहे. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित, चित्रपटाने ६१ कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट तब्बल १०० कोटींमध्ये निर्मित झाला आहे. चित्रपट येत्या काही दिवसातच १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर, बॉबी देओल आहेत.

‘ॲनिमल’ एकूण भाषांमध्ये रिलीज झाला आहे. एकट्या हिंदी भाषेत चित्रपटाने ५० कमावले आहे. पठान, गदर २ आणि टाइगर ३चे रेकॉर्ड मोडत ओपनिंगला सर्वाधिक कमाई करणारा ‘ॲनिमल’ बॉलिवूड चित्रपट ठरला आहे.

Animal- Sam Bahadur 1st Day Box Office Collection
Panchak Official Teaser: आता कोणाचा नंबर? ‘पंचक’चा उत्कंठा वाढवणारा टीझर प्रदर्शित...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com