Taarak Mehata Ka Ooltah Chashmah: मालिकेचा झाला गेम, गेमचा झाला सिनेमा; असित कुमार मोदी जोमात...

मालिकेचे निर्माते असित मोदी आता ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’वर चित्रपट बनवणार असल्याची माहिती मिळत आहे.
Taarak Mehata Ka Ooltah Chashmah Film
Taarak Mehata Ka Ooltah Chashmah FilmSaam Tv

Taarak Mehata Ka Ooltah Chashmah Film: ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेची नेहमीच प्रेक्षकांमध्ये चर्चा असते. गेल्या १५ वर्षांपासून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेतील अनेक कलाकारांनी सोडचिठ्ठी दिली असली तरी, या शोची लोकप्रियता आणि चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, मालिकेचे निर्माते असित मोदी आता ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’वर चित्रपट बनवणार असल्याची माहिती मिळत आहे. निर्मात्यांना हा चित्रपट जबरदस्त बनवायचा आहे, असे त्यांचे मत आहे.

Taarak Mehata Ka Ooltah Chashmah Film
Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीन सिद्दीकीचा कौटुंबिक वाद पेटला; भावासह पत्नीवर केले गंभीर आरोप

गेल्या वर्षी मालिकेच्या निर्मात्यांनी या मालिकेवर एक कार्टून फिल्म लाँच केली होती. ज्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. नंतर निर्मात्यांनी एक मोबाईल गेम देखील आणला होता. त्या गेमिंग सीरिजचे नाव होते ‘रन जेठा रन’ जी प्रेक्षकांमध्ये खूपच हिट ठरली होती. चित्रपटाविषयी मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी म्हणतात, मला ‘तारक मेहता’ यांच्या स्टोरीवर युनिव्हर्स चित्रपट बनवायचा आहे. असित कुमार मोदी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या शोबाबतच्या त्यांच्या नियोजनाविषयी सविस्तर माहिती दिली.

‘न्यूज18’सोबत बोलताना असित मोदींना त्यांच्या सुपरहिट शोवर चित्रपट बनवण्याचा विचार आहे का, असे विचारले असता त्यांनी होकार देत सांगितले की, ‘होय, लवकरच मी चित्रपटही बनवणार आहे. आणि एक ॲनिमेटेड चित्रपटही बनवणार आहे. सर्व काही त्या चित्रपटांमध्ये असणार आहे. आम्हाला ‘तारक मेहता’ या चित्रपटाला खूपच छान बनवायचे आहे. गेल्या १५ वर्षांपासून मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मालिकेचा डिजीटल प्लॅटफॉर्मवर देखील चांगलाच बोलबाला आहे.’

Taarak Mehata Ka Ooltah Chashmah Film
Ketaki Chitale: ‘लोक मलाही घाबरले होते का?...’; राहुल गांधींच्या प्रकरणानंतर केतकीची पोस्ट चर्चेत

असित कुमार पुढे म्हणतात, ‘नेहमीच प्रेक्षक मालिकेतील पात्रांना आपल्या घरातील सदस्यांसारखे ट्रीट करतात. मला वाटले की लोक या पात्रांवर खूप प्रेम करतात, मग त्यांच्यावरही एक गेम तयार करायचा आहे. मोबाईलवर अनेक युजर्स नेहमीच खूप गेम खेळतात. प्रवासात किंवा ऑफिसमध्ये फ्री वेळेत त्यांना गेम्स खेळायला आवडतं. त्यामुळे मी मालिकेचा गेम तयार करण्याचा विचार केला.’

जेव्हा निर्मात्यांना चित्रपट बनवण्याची कल्पना आणि व्याप्तीबद्दल विचारण्यात आले तेव्हा निर्माते म्हणतात, ‘मला वाटते की सर्व वयोगटातील प्रेक्षक आमच्या शोसोबत जोडले आहेत. माझ्या चित्रपटात प्रत्येक प्रेक्षकासाठी काहीतरी खास असायला हवं. आम्ही या गेमला ब्लॉकचेनशी जोडण्यावरही काम करत आहोत. तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने काहीतरी केले पाहिजे. याशिवाय आपण काहीही करू शकत नाही. हे डिजिटल जग बनत आहे.’

Taarak Mehata Ka Ooltah Chashmah Film
Sankarshan Karhade: संकर्षणने दिली आनंदाची बातमी; फॅन्ससह कलाकारांनीही दिल्या शुभेच्छा

असित मोदी पुढे म्हणाले, म्हणूनच मला वाटले की ‘तारक मेहता’ केवळ टेलिव्हिजन शोपुरता मर्यादित राहू नये. त्यात अजून बरेच काही आहे. टीव्ही आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. ‘तारक मेहता’ टीव्हीवर सुरूच राहणार, पण आणखी काय करावं? म्हणूनच आम्ही गेम देखील सुरु केला. दयाबेन व्यतिरिक्त लवकरच 'पोपटलाल की शादी' यासह इतर गेम लॉन्च करण्याचा विचार असित मोदींनी केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com