Suraj Chavan  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Suraj Chavan : डीजेच्या दणदणाटामुळे घोडा बिथरला, नवरदेवाला घेऊन पळाला; सूरजने सांगितला गावाकडचा किस्सा

Suraj Chavan Share Comedy Story : बिग बॉसच्या घरात लिव्हिंग एरियात बसून पॅडी भाऊ आणि सूरज गप्पा मारत आहेत. या गप्पांमध्ये सूरज पॅडी भाऊला एक धमाल किस्सा सांगतो.

Shreya Maskar

बिग बॉसच्या घरात भांडणे, खेळ यांसोबत गप्पा गोष्टी, सकाळचा डान्स इत्यादी धमाल गोष्टी सुद्धा होताना पाहायला मिळतात. प्रत्येक दिवस हा उत्साहाने सुरू होतो. या घरात अनेकांची मैत्रीची नाती झाली आहेत. आपण नेहमी पाहतो की टास्क संपल्यावर संध्याकाळी ही मंडळी गप्पा मारताना दिसतात. या गप्पा कधी टास्कवर असतात तर कधी इतर कोणत्याही मजेदार गोष्टींवर असतात. असाच एक बिग बॉस घरातील किस्सा समोर आला आहे. जो ऐकून तुम्ही नक्कीच खूप हसाल.

बिग बॉसच्या घरात लिव्हिंग एरियात सूरज, पॅडी भाऊ (Paddy Dada) आणि अंकिता यांच्यात छा गप्पा रंगणार आहेत. हे तिघेही एकमेकांशी मनसोक्त गप्पा मारताना दिसणार आहेत. या गप्पांमध्ये सूरजने पॅडी भाऊंना लग्नाच्या वरातीतला एक किस्सा सांगितला आहे.

सूरज (Suraj Chavan) किस्सा सांगताना म्हणतो की, "आमच्या गावात वरात घोड्यावरून निघते आणि डीजे असला की पोरी घोड्यावर बसतात. त्यानंतर घोडा आणि पोरी दोघे सुद्धा नाचतात. घोडा कधी-कधी पाय वर करून नाचतो तेव्हा पोरी घाबरता मग पोरी घोड्याची लगाम खेचतात." यावर पॅडी (Pandharinath Kamble) भाऊ म्हणाले की, " घोड्याचे पाय वर होतात का?" यावर उत्तर देत सूरज म्हणतो की, एकदा असेच झाले होते. एका घोड्याने पाय वर केले आणि तो नवरा मुलगा खाली पडला आणि त्याच्या खाली माणसे देखील दबली गेली. अजून एका लग्नात तर घोडा नवरा मुलाला घेऊन पळाला आणि परत आलाच नाही." यावर पॅडी भाऊ म्हणाले," हे सगळे तुझ्याच गावी कसे होते." असे बोलून दोघे असू लागतात.

सध्या बिग बॉसमध्ये लगोराचा टास्क पार पडत आहे. यात अंकिता आणि वर्षाताईमध्ये जबरदस्त राडा पाहायला मिळाला आहे. अंकिता वर्षा ताईला खेचत ओढताना दिसत आहे. या आठवड्यात बिग बॉसच्या घरातील सर्व सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता कोणाला तिकीट टू फिनाले मिळणार आणि कोण घराबाहेर जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: महामार्गावर ३ वाहनांचा विचित्र अपघात, दोन कारची कंटेनरला धडक; दोघांचा जागीच मृत्यू

सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघातात मृत्यू, साताऱ्यातील दुर्दैवी घटना

Yellow Saree Designs: हळदीला नेसा पिवळ्या रंगाची साडी, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

Matar Paratha Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी मटार पराठा, वाचा सोपी रेसिपी

Liver damage symptoms: ही लक्षणं दिसली तर समजा लिव्हर हळूहळू होतंय खराब

SCROLL FOR NEXT