Bigg Boss Marathi: 'बी टीम'मध्ये पडणार फूट? DP आणि अंकिता निघाले दगाबाज? भाऊच्या धक्क्यावर पॅडी समोर आलं सत्य

Bigg Boss Marathi 5 New Promo: बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा मैत्रीमध्ये फुट पडणार? भाऊच्या धक्क्याच्या भागात रितेश अंकिता आणि डिपीचं सत्य पॅडी समोर आणणार
Bigg Boss Marathi 5 New Promo:
Bigg Boss Marathicanva
Published On

बिग बॉसचं घर म्हटलं की तिथे राडे, भांडण आलेचं. बिग बॉस मराठीच्या ५व्या सीझनमध्ये पहिल्या दिवसापासून राडे पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सदस्यांमध्ये टास्कदरम्यान धक्काबुक्की आणि भांडण पाहायला मिळत आहेत. घरामधील अनेक सदस्यांमध्ये अगदी घरातील सदस्यांसारखं नातं निर्माण झालं आहे. घरामध्ये एकमेकांना जेव्हा हवा असतो त्यावेळी घरातील सदस्य मदतीसाठी धावून जातात.

कॅप्टनसी टास्क दरम्यान आर्याने निक्कीच्या कानाखाली मारली.त्यामुळे कॅप्टनसी टास्क रद्द करण्यात आला होता आणि बिग बॉसकडून आर्याला शिक्षा करण्यात आली होती. त्यावेळी आर्याच्या घरातील अनेक सदस्यांनी तिला पाठिंबा दिला होता. मात्र आर्याने केलेल्या चुकीमुळे तिला शिक्षा ठोठवण्यात आली होती. त्यानंतर गार्डन एरियामध्ये सर्व सदस्यांना एकत्र आणून एक टास्क पार पडला.

Bigg Boss Marathi 5 New Promo:
Big Boss Marathi: आर्याने निक्कीला कानाखाली मारल्याचा व्हिडिओ दाखवा; अभिनेत्री सुरेखानं बिग बॉसकडे केली मागणी

या टास्कमध्ये घरातील सदस्यांना ते ज्या सदस्यासोबत कम्फर्टेबल आहेत त्या सदस्याविषयी बोलायचे होते. या टास्कदरम्यान घरातील सर्व सदस्य त्यांच्या मित्रांबद्दल बोलताना दिसले. पॅडी दादांनी सुरजचं भरभरुन कौतुक केलं. पॅडी दादा म्हणाले की, "सुरज माझ्या भावा सारखा वाटतो त्याला घेऊन मी खूप हळवा आहे. त्याच्या काही गोष्टी मला पटत नाहीत त्या मी त्याला हक्काने समजवतो आणि त्याला काही गोष्टींसाठी प्रेत्साहित देखील करतो."त्यानंतर पॅडी अंकिताचे कौतुक करत म्हणतो, अंकिता या घरातील माझी सर्वात जवळची मैत्रीण आहे.तिची गेम खेळण्याची स्टाईल अत्यंत आवडते. त्यानंतर पॅडीने डिपी दादाचंदेखील कौतुक केले होते.पॅडी दादांसाठी हे तिन्ही सदस्य अत्यंत खास मानले जातात.

प्रदर्शित झालेल्या नव्या प्रोमोमध्ये रितेश देशमुख पॅडी दादाला चक्रव्यूह रुममध्ये बोलावतो आणि एक व्हिडिओ दाखवतो. या व्हिडिओमध्ये अंकिता आणि डिपी दादा पॅडीबद्दल बोलतांना दिसत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर पॅडी दादा म्हणतो की, "मी कोणताही गेम स्वार्थी मनाने खेळलो नाही. घराच्या बाहेर गेल्यावर लोकांना स्वार्थ काय असतो ते कळेल. मी या घरातील सदस्यांबद्दल निस्वार्थी मनाने खेळत आहे." हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अंकिता, डिपी आणि पॅडीच्या नात्यामध्ये फुट पडणार का? हे पाहणं रंजक ठरेल.

Edited By: Nirmiti Rasal.

Bigg Boss Marathi 5 New Promo:
Big Boss Marathi: आर्याने निक्कीला कानाखाली मारल्याचा व्हिडिओ दाखवा; अभिनेत्री सुरेखानं बिग बॉसकडे केली मागणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com