Bigg Boss Marathi : पाण्यातला गेंडा असतो कसा? अंकिताचा अभिनय पाहून सूरज चक्रावला, पाहा VIDEO

Suraj-Ankita : 'बिग बॉस मराठी'मध्ये सध्या 'जंगलराज' टास्क होत आहे. सदस्य खूप धमाल करताना पाहायला मिळत आहेत. अशात आता सूरज आणि अंकिताचा भन्नाट व्हिडीओ समोर आला आहे.
Suraj-Ankita
Bigg Boss MarathiSAAM TV
Published On

'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) चा सीजन चांगलाच रंगताना दिसत आहे. भांडणांसोबत नवीन टास्क देखील पाहायला मिळत आहेत. या आठवड्यात 'जंगलराज' अशी थीम आहे. कोण ठरणार जंगलचा राजा हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. 'जंगलराज' या थीमच्या अंतर्गत 'शिकाऱ्याची बंदूक' हा टास्क देण्यात आला त्यात जान्हवी, सूरज, अरबाज, निक्की आणि वर्षा नॉमिनेट झाले.

'बिग बॉस मराठी' नवीन प्रोमो नुकताच समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अंकिता (Ankita Walawalkar) सूरजला अभिनय करून प्राणी ओळखण्यास सांगत आहे. त्यांच्या धमाल मस्ती होताना पाहायला मिळत आहे. अंकिताचा अभिनय सूरजला (Suraj Chavan) ओळखता येत नाही आहे. या टास्कमध्ये अंकिता सूरजला पाणगेंड्याची ॲक्टिंग करुन दाखवत आहे, मात्र त्याला ती ओळखता येत नाही आहे. त्यांनी पाणगेंडा ऐवजी गेंडा ओळखला आहे. तो अंकिताला विचारतो की, "पाण्यातला गेंडा असतो कसा?" यावर सर्वजण हसू लागतात. हा बिग बॉसच्या घरातला 'जंगलराज' या थीमच्या अंतर्गत नवा टास्क आहे. या टास्कमध्ये घरातील सदस्यांना दोन टीम करून हा खेळ खेळायचा आहे. एका टीम मेंबरने अभिनय करायचा तर दुसऱ्या टीम मेंबरने तो कसला अभिनय आहे हे ओळखायचे आहे. आपला टीम मेंबर ज्या प्रमाण्याचा अभिनय करत आहे. तो प्राणी ओळखून अ‍ॅक्टिव्हिटी रुममधून तो प्राणी शोधून घेऊन आणायचा आहे.

या खेळाची पहिली जोडी पॅडी आणि संग्राम २० हजार रुपये बीबी करन्सी कमावतात. तर दुसरीकडे वर्षा आणि धनंजय हे ३० हजार बीबी करन्सी कमावतात. तिसऱ्या फेरी जान्हवी आणि अरबाज खेळतात. मात्र त्यांना काकाकुवा हा पक्षी ओळखताना तारांबळ उडते आणि पक्षी नीट न लावल्यामुळे परिणामी टाकीतलं पाणी संपते आणि तिसरी फेरी रद्द होते. या टास्कचा महत्त्वाचा उद्देश गॅस मिळवणे होय. बीबी करन्सी जेवढी कमी असणार तेवढा सदस्यांना गॅस वापरता कमी करता येणार. त्यामुळे आता अंकिता आणि सूरज बीबी करन्सी मिळवू शकणार का? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

Suraj-Ankita
Salman Khan : भाईजानच्या नावावर मोठा घोटाळा; सलमानकडून कारवाईचा इशारा, नेमकं काय घडतंय जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com