हल्ली सर्वच बाबतीत फसवणूक वाढत जात आहे. वेगवेगळ्या पद्धतीने जनतेची फसवणूक होत आहे. यात कलाकारांच्या नावाचा वापर करून फसवणुकीचा धंदा चालत आहे. आपल्या आवडत्या स्टारच्या नावावर चाहत्यांची फसवणूक केली जात आहे. त्यांच्याकडून पैसे लुटले जातात. नुकतीच एक फसवणुकीची घटना समोर आली आहे.
बॉलिवूडचा भाईजानच्या बाबतीत फसवणूक झाली आहे. यासंबंधीची माहिती त्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. सलमान (Salman Khan) अमेरिकेत कॉन्सर्ट करणार असल्याच्या बातम्या येत होत्या. आता या फेक न्यूजवर अभिनेत्याने स्पष्टीकरण दिले आहे. सलमान खानने इंस्टाग्रामवर एक नोट शेअर करून याबाबत खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले आहे की, तो कोणताही कॉन्सर्ट करत नाही.
भाईजानने पुढेपोस्टमध्ये म्हटलं आहे की, "सलमान अमेरिकेत कॉन्सर्ट (Salman Khan US Tour Ticket Fraud) करणार असल्याच्या दावे पूर्णपणे खोटे आहेत. अशा कॉन्सर्टचा प्रचार करणाऱ्या कोणत्याही ईमेल, मेसेज किंवा जाहिरातीवर विश्वास ठेवू नका. सलमान खानच्या नावाचा कोणी गैरवापर करताना आढळले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. सलमान खान किंवा त्याची कोणतीही कंपनी किंवा टीम 2024 मध्ये यूएसएमध्ये कोणताही संगीत कार्यक्रम आयोजित करत नाही." अशी माहिती सलमान खानने दिली आहे.
सलमान खान सध्या आगामी चित्रपट 'सिकंदर' च्या कामात व्यस्त आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना त्याच्या सोबत दिसणार आहे. 'सिकंदर' (Sikandar) चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच भाईजान बिग बॉस १८ (Bigg Boss 18 ) चं होस्टिंग देखील करणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.