Vanraj Left Anupama SAAM TV
मनोरंजन बातम्या

Vanraj Left Anupama : वनराजचा 'अनुपमा'ला निरोप; ४ वर्षांनंतर सोडली मालिका; सोशल मीडियावर व्हिडिओ केला शेअर

Sudhanshu Pandey Left Anupama show : हिंदी मालिका 'अनुपमा' प्रेक्षकांच्या चांगली पसंतीस उतरली आहे. सध्या 'अनुपमा'मध्ये वनराजची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने म्हणजे सुधांशु पांडे यांनी मालिकेचा निरोप घेतला आहे.

Shreya Maskar

मराठी मालिका 'आई कुठे काय करते' याचा रिमेक असलेली हिंदी मालिका 'अनुपमा' (Anupamaa) विषयी मोठी अपडेट समोर आली आहे. काही काळापासून अनुपमा ही टीव्ही सिरीयल लीप घेणार अशी चर्चा सुरु आहे. लीपनंतर रुपाली गांगुली (Rupali Ganguly) आणि गौरव खन्ना या शोचा भाग नसल्याचेही बोलले जात आहे. पण या सगळ्या दरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शोमध्ये वनराज शाहची भूमिका साकारणारा सुधांशु पांडेने 'अनुपमा' सिरीयल सोडली आहे.

'अनुपमा' मालिका सुधांशु पांडे (Sudhanshu Pandey) यांनी सोडली आहे. सुधांशु पांडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही बातमी दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्या तो बोलत आहे की, नमस्कार मित्रांनो! तुम्हाला माहित असेल की, मी गेल्या चार वर्षापासून 'अनुपमा' सिरीयलमध्ये काम करत आहे. या व्यक्तिरेखेने मला खूप प्रेम तसेच नाराजी देखील दिली. पण या नाराजीतही माझ्यासाठी प्रेम आहे.

सुधांशु पांडे पुढे म्हणाले की, तुम्ही मला खूप प्रेम आणि पाठिंबा दिला, पण मी या शोचा आता भाग नाही. मी आता वनराज शाहची भूमिका करत नाही. रक्षाबंधनपासून मी या शोचा भाग नाही. खूप दिवस उलटून गेल्यावर मला तुम्हाला हे सांगावस वाटलं. तुमच्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद. अशाप्रकारे सुधांशु पांडे यांनी व्हिडिओमधून संवाद साधला आहे. अद्यापही सुधांशु पांडे यांनी मालिका का सोडली, याचे कारण स्पष्ट केले नाही आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ओटीपी येतोय, पण केवायसी प्रक्रिया पूर्ण होतच नाही, लाडक्या बहि‍णींपुढे नवे संकट, काय करावे?

Maharashtra Dasara Melava Live Update : देशाला आत्मनिर्भर होण्याची गरज - मोहन भागवत

IND vs WI: 347 दिवसांनंतर 'या' गेमचेंजर खेळाडूची अखेर टीममध्ये एन्ट्री; पाहा वेस्ट इंडिजविरूद्ध कशी आहे प्लेईंग 11

Satara Tourism : साताऱ्याला गेल्यावर करा ट्रेकिंगचा प्लान, दिवसभर होईल धमाल-मस्ती

Jio Recharge Plan: सप्टेंबर २०२६ पर्यंत रिचार्जची चिंता मिटली! एकदाच रिचार्ज करा, संपूर्ण वर्षभर मोबाईल वापरा

SCROLL FOR NEXT