Bigg Boss Marathi 5
Bigg Boss Marathi 5Saam Tv

Bigg Boss Marathi 5: 'यापुढे मला तुझा पार्टनर नाही बनायचं...', अभिजीतच्या निर्णयाने निक्की पडणार एकटी

Bigg Boss Marathi New Promo: बिग बॉसच्या घरात दोन्ही टीममध्ये आज टास्क पार पडणार आहे. दोन्ही टीममधील सर्व स्पर्धक पाताळलोकात सोन्याची नाणी शोधायला जाणार आहेत.
Published on

बिग बॉस मराठी सध्या जबरदस्त चर्चेत आहे. हा शो सुरू झाल्यापासून प्रेक्षकांची मने जिंकत आहे. रोज नवनवीन टास्क या शोमध्ये पाहायला मिळतात. अशातच आता बिग बॉसचा नवीन प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोमध्ये बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना नवीन टास्क दिला आहे.

Bigg Boss Marathi 5
Tarak Mehta Ka Ooltah Chashma शोमधून आत्माराम भिडे घेणार एक्झिट? अभिनेत्याने स्वत:च केला खुलासा

बिग बॉसच्या घरात दोन्ही टीममध्ये आज टास्क पार पडणार आहे. दोन्ही टीममधील सर्व स्पर्धक पाताळलोकात सोन्याची नाणी शोधायला जाणार आहेत. प्रोमोमध्ये, बिग बॉस "पाताळलोकात सदस्यांना शोधावी लागणार सोन्याची नाणी" असं म्हणत आहेत. दरम्यान सर्व स्पर्धक सोन्याची नाणी शोधून आणतात, यावेळी अरबाज आर्याला म्हणतोय की, "आर्या आपले कमी आहेत... लवकरच नाणी आण" दरम्यान कॅप्टन निक्की टीम बीने आणलेली नाणी अपात्र ठरवताना दिसत आहे.

निक्कीच्या या निर्णयावर डीपी दादा म्हणतो.."पोटाला खायला अन्न मिळणार आहे त्या करन्सीवर" तर पुढे अभिजीत म्हणतो, "यापुढे मला पार्टनर नाही बनायचय" अभिजीतने घेतलेल्या या निर्णयावर सर्व स्पर्धक सॅल्युट करत आहे. यावरून आता अभिजीतला निक्कीचा हा निर्णय आवडला नसल्याचे दिसत आहे.

कॅप्टन निक्कीने टीम बीची सोन्याची नाणी अपात्र ठरवल्यानंतर अभिजीतने देखील मला पार्टनर बनायचा नाही असा निर्णय घेतला आहे. यामुळे निक्की आता एकटी पडणार का? हे आजच्या एपिसोडमध्ये पाहणं महत्वाचं असेल.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com