कोलकातामध्ये झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. अशातच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली असून लोकप्रिय अभिनेता आणि राजकारणी सिद्दीकी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्दीकी यांच्यावर एका अभिनेत्रीने लैंगिक छळाचा आरोप केल्यानंतर केरळ पोलिसांनी ही मोठी कारवाई केली असून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, हेमा समितीच्या अहवालानंतर केरळच्या सिनेजगतात खळबळ उडाली आहे. अशातच मल्याळम चित्रपट अभिनेता सिद्दीकी यांच्यावर एका अभिनेत्रीने लैंगिक छळाचा आरोप केल्यानंतर आता त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्दीकी याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (बलात्कार) आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे एका बड्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे. हे प्रकरण २०१६ मधील असल्याचे सांगण्यात येत आहे.
न्यायमूर्ती हेमा समितीच्या अहवालात झालेल्या खुलाशानंतर अनेक दाक्षिणात्य दिग्दर्शक आणि अभिनेत्यांवर लैंगिक छळाचे आरोप करण्यात आले होते. अशातच चित्रपटसृष्टीतील 'हाय प्रोफाईल' व्यक्तिमत्त्वावर झालेली ही दुसरी केस असून म्युझियम पोलीस स्टेशन हद्दीतील राजधानी शहरातील एका हॉटेलच्या खोलीत ही घटना घडल्याचा आरोप अभिनेत्यावर करण्यात आहे.
हेमा न्याय समितीच्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर विविध दिग्दर्शक आणि अभिनेत्यांवर लैंगिक छळाच्या आरोपानंतर चित्रपट जगतातील प्रसिद्ध व्यक्तींविरुद्ध दाखल करण्यात आलेली ही दुसरी एफआयआर आहे. याआधी 2009 मधील एका कथित घटनेबाबत पश्चिम बंगालमधील एका महिला अभिनेत्याने केलेल्या तक्रारीच्या आधारे, आयपीसी कलम 354 (महिलेवर तिचा विनयभंग करण्याच्या हेतूने प्राणघातक हल्ला किंवा गुन्हेगारी बळजबरी) नुसार पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.