Badalapur Case : शाळकरी मुलीसोबत अत्याचार झाल्यामुळे बदलापूर (Badalapur Case) हादरले असतानाच आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बदलापुरात एका 11 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिला गरोदर करणाऱ्या (Badlapur girl physical abuse) नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपीला न्यायालयाने 31 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
बदलापुरात एका नव्या इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या नेपाळी कुटुंबातील चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला होता. जून महिन्यात नरेश उर्फ नागेश दाडे या आरोपीने या मुलीच्या घरात कुणी नसल्याचं पाहून घरात घुसून या मुलीवर अत्याचार केला. तसंच घरात कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे या चिमुकलीने देखील हा अत्याचार सहन केला होता. मात्र जुलै महिन्यात ती पीडित मुलगी गरोदर राहिल्यानं हे प्रकरण उघड झालं.
पोलिसांची आधी चालढकल, मग वेगानं कारवाई -
11 वर्षाची मुलगी गरोदर असल्याचं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर तिच्या पालकांनी बदलापूर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. मात्र आरोपीला अटक करण्यास तत्कालीन अधिकाऱ्यांनी चालढकल केली. बदलापुरातील दोन चिमुकल्यां मुलींवरील अत्याचार प्रकरणात बदलापूर तापल्यानंतर पोलीस ठाण्यातील सर्व निष्क्रिय पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करून त्या ठिकाणी नव्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली.
या नव्या अधिकाऱ्यांनी लागलीच या प्रकरणाचा तपास जलदगतीने सुरू करून आरोपीला अटक करण्यासाठी पथक रवाना केलं. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेश गज्जल यांनी तेलंगणा राज्यात पोलीस पथकाला पाठवून आरोपीला बेड्या ठोकल्या. या आरोपीला न्यायालयाने 31 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.