Pune Crime : IPS भाग्यश्री नवटाके पुन्हा वादात; बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद, काय आहे प्रकरण? VIDEO

IPS भाग्यश्री नवटाके पुन्हा वादात अडकल्या आहेत. आयपीएस नवटाके यांच्या विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद नोंदवण्यात आला आहे. भाईचंद हिराचंद रायसोनी प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
IPS भाग्यश्री नवटाके पुन्हा वादात; बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद, काय आहे प्रकरण?
IPS bhagyashree navtakeSaam tv
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे : आयपीएस भाग्यश्री नवटाके पुन्हा एकदा वादात सापडल्या आहेत. आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटाके यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भाईचंद हिराचंद रायसोनी प्रकरणी नवटाके यांच्याविरोधात बंडगार्डन पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामुळे आयपीएस भाग्यश्री नवटाके यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

नवटाके यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाल्याने त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. काही वर्षांपूर्वी आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटक्के यांनी जातीय तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याने अडचणीत सापडल्या होत्या. नवटाके यांचं जातीय तेढ निर्माण करणारं वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. यानंतर भाग्यश्री यांना पोलीस सेवेतून बडतर्फ मागणी करण्यात आली होती. या वादग्रस्त वक्तव्यानंतर आयपीएस भाग्यश्री यांची बीडवरून छत्रपती संभाजीनगरला बदली झाली होती. आता भाग्यश्री नवटाके या भाईचंद हिराचंद रायसोनी प्रकरणामुळे चर्चेत आल्या आहेत.

IPS भाग्यश्री नवटाके पुन्हा वादात; बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद, काय आहे प्रकरण?
IPS Aashna Chaudhary : प्रसिद्ध IPS अधिकारी आशना चौधरीच्या यशाचा प्रवास

भाईचंद हिराचंद रायसोनी प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नवटाके यांच्या विरोधात पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गृह विभागाच्या आदेशानंतर पुणे पोलिसांनी नवटाके यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बीएचआर या पतसंस्थेने ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यात 2021 मध्ये गुन्हा दाखल होता. या प्रकरणात त्यांनी विनाकारण तीन गुन्हे नोंदवल्याचा आरोप आहे. नवटाके या त्यावेळी पुणे पोलिसांच्या EOW विभागाच्या पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत होत्या.

काय आहे भाईचंद हिराचंद रायसोनी प्रकरण?

जळगावच्या चाळीसगावात बीएचआर संस्थेच्या चार गाळ्यांमध्ये शाखा आहेत. या शाखा स्वत:च्या नावावर नसताना संस्थेचा प्रमुख प्रमोद रायसोनी व त्याची पत्नी कल्पना यांनी ८ फेब्रवारी २००६ साली मुख्य व्यवस्थापक माळीच्या मदतीने खोटे करारनामे केले. या करारनाम्यात गाळे स्वत:च्या नावावर असल्याचे नमूद केले. त्यानंतर या गाळ्यांचे डिपॉझिट म्हणून २५ लाख रुपये घेतले होते. तर देखभाल खर्चासाठी दरमहा पाच हजार रुपये घेतले होते.

IPS भाग्यश्री नवटाके पुन्हा वादात; बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद, काय आहे प्रकरण?
Sangli Crime: सांगली रक्तरंजित थरार! भररस्त्यात कबड्डीपटूची निर्घृण हत्या, शहरात खळबळ

पुढे २०१५ साली ही संस्था अवसायानात गेली. त्यानंतर या संस्थेच्या शाखा, डिपॉझिट, व्यवहार, डेडस्टॉक, आर्थिक व्यवहार तपासण्यात आले. यावेळी चाळीसगावातील चार गाळ्यांचे करारनामे खोटे असल्याचे आढळले. हे गाळे सुनीता वाणी यांच्याकडून कल्पना रायसोनी यांनी २००६ साली आठ लाख २५ हजारांना खरेदी केल्याचे आढळले. तर संस्थेत हे गाळे प्रमोद रायसोनीच्या नावे दाखवून पैसे काढून घेतल्याचे समोर आले. त्यानंतर रायसोनी आणि माळी यांनी पसंसस्थेच्या सभासद, ठेवीदारांची फसवणूक आणि अपहार केल्याचे निष्पन्न झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com