Mansoor Ali Khan And Trisha Krishnan  Saam Tv
मनोरंजन बातम्या

'Trisha Krishnan ची माफी मागणार नाही, 'बेडरूम सीन'च्या वादानंतर Mansoor Ali Khan चे सूर बदलले

Mansoor Ali Khan Statement: मन्सूर अली खान यांच्या या वक्तव्याचा निषेध केला जात असून यावर अनेक सेलिब्रिटींनी नाराजी व्यक्त केली आहे.

Priya More

Mansoor Ali Khan Controversy:

साऊथ सुपरस्टार थलपथी विजयचा (Thalapati Vijay) सुपरहिट चित्रपट 'लिओ'ने (Leo Movie) बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आता या चित्रपटातील कलाकार चर्चेत आले आहेत. या चित्रपटात काम केलेला अभिनेता मन्सूर अली खानने (Mansoor Ali Khan) अभिनेत्री त्रिशा कृष्णनबद्दल (Trisha Krishnan) आक्षेपार्ह वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे. मन्सूर अली खान यांच्या या वक्तव्याचा निषेध केला जात असून यावर अनेक सेलिब्रिटींनी नाराजी व्यक्त केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

२१ नोव्हेंबर रोजी मन्सूर अली खान यांनी चेन्नई येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, मी या वक्तव्याबद्दल माफी मागणार नाही. मन्सूर अली खानच्या वक्तव्यानंतर नादिगर संगमने त्यांच्यावर तात्पुरती बंदी घातली. तर त्रिशाच्या समर्थनार्थ आलेल्या 'लिओ' अभिनेता-दिग्दर्शक लोकेश कनागराज, चिरंजीवी आणि इतर अनेक कलाकारांनी मन्सूर अली खान यांच्यावर टीका केली. दुसरीकडे, त्रिशाने भविष्यात मन्सूरसोबत कधीही स्क्रीन शेअर न करण्याची शपथ घेतली.

हा संपूर्ण वाद तेव्हा सुरू झाला जेव्हा मन्सूर अली खान यांनी त्यांच्या एका वक्तव्यात मी 'लिओ'चा एक भाग असताना सुद्धा त्रिशासोबत माझा कोणताही 'रेप' सीन नाही असे म्हटले होते. त्याने पुढे असे देखील सांगितले की,तिच्यासोबत 'बेडरूम सीन' करण्याची संधी मी गमावली. अभिनेत्याच्या या वक्तव्यानंतर गदारोळ झाला आणि त्रिशाने देखील अभिनेत्याला खडेबोल सुनावले.

हा वाद वाढल्यानंतर आणि नदीगर संगमने मन्सूर अली खान यांच्यावर तात्पुरती बंदी घातल्यानंतर मन्सूरने २१ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मन्सूर यांनी सांगितले की, जेव्हा मी काही चूक केली आहे हे लक्षात येईल तेव्ही मी माफी मागेल आणि हे वक्तव्य मागे घेईल.'

ते म्हणाले, 'नादिगर संगमने माफी मागण्यापर्यंत माझ्यावर तात्पुरती बंदी घालून चूक केली. जेव्हा हा मुद्दा समोर आला तर त्यांनी माझ्याकडून खुलासाही मागितला नाही. त्यांनी मला फोन करायला हवा होता किंवा नोटीस बजावून खुलासा मागायला हवा होता. चौकशी व्हायला हवी. पण तसे झाले नाही.'

मन्सूर यांनी पुढे सांगितले की, 'माझ्याविरोधातील वक्तव्य मागे घेण्यासाठी मी नदीगर संगमला चार तासांचा वेळ देईन. मी माफी मागितली पाहिजे असे ते म्हणाले. मी माफी मागणाऱ्या व्यक्तीसारखा दिसतो का? मीडिया माझ्याविरोधात वाटेल ते लिहू शकते, मी कोण आहे हे लोकांना माहीत आहे. मला तमिळ लोकांचा पाठिंबा आहे.'

तसंच, 'प्रसारमाध्यमांनी त्रिशाचे निवेदन प्रसिद्ध केले आणि आमच्या दोघांचा फोटो प्रकाशित केला ज्यामध्ये आम्ही वधू-वरासारखे दिसत होतो. तुम्ही सर्वजण माझे एक चांगले फोटो वापरू शकत नाही का? असा सवाल करत त्यांनी काही फोटोंमध्ये मी अजूनही छान दिसतो असे त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: निवडणुका स्थगित करा; राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह विरोधकांची मागणी, काय आहे कारण?

NCP MLA Sunil Shelke: 'मी जादूटोणा करतो, EVM हॅक करतो', राष्ट्रवादीच्या आमदाराकडून ईव्हीएम वश

Election Commission of India: मतदार यादीत घोळ, आयोगाची वेबसाईट कोण हँडल करतंय? वडेट्टीवारांचा आरोप

Maharashtra Politics: शरद पवार यांना धक्का! पक्षफुटीनंतरही साथ न सोडणाऱ्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Fact Check: दिवाळीत अंबानींकडून 'फ्री गोल्ड'; सोन्याची चेन मोफत देण्याची घोषणा? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT