साऊथचा सुपरस्टार थलपथी विजयचा (Vijay Thalapathy) 'लिओ' चित्रपट (Leo Movie) नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. 19 ऑक्टोबरला म्हणजेच गुरूवारी रिलीज झालेल्या 'लिओ'ची बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगलीच हवा पाहायला मिळत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरबाहेर मोठी रांग लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यावरून थलपथीची चाहत्यांवर जादू झाल्याचे दिसून येत आहे. अशामध्ये या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली याची आकडेवारी समोर आली आहे.
महत्वाचे म्हणजे, बॉक्स ऑफिसवर दुष्काळ असतानाही बॉलिवूड आणि साऊथच्या चित्रपटांनी आता कमाईचा महापूर आणला आहे. या वर्षात बॉलिवूडपासून दक्षिणेपर्यंत अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. काही चित्रपट सुरुवातीपासून ते आतापर्यंत चर्चेत राहिले. शाहरुखच्या 'जवान' आणि सनी देओलच्या 'गदर २' या चित्रपटांनी केलेल्या कमाईच्या आकडेवारीने तर सर्वांना चकीत केले. अजूनही या चित्रपटाची कमाई सुरूच आहे. आता या वर्षीच्या ब्लॉकबस्टर ओपनिंगच्या यादीत साऊथचा सुपरस्टार थलपती विजयचा 'लिओ' या चित्रपटाचे नावही जोडले गेले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
'लिओ'चित्रपटाची रिलीजच्या पूर्वीपासूनच जोरदार चर्चा होती. प्रेक्षक आतुरतेने या चित्रपटाची वाट पाहत होते. अखेर गुरूवारी त्यांची प्रतीक्षा संपली. अनेक व्यापार विश्लेषकांच्या मते असा दावा करण्यात आला होता की, विजय थलपथीचा 'लिओ' पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल. त्यांचे हे म्हणणं खरं ठरलं आहे. 'लिओ'ने पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई केली आहे. sacnilk नुसार, थलपथी विजयच्या या चित्रपटाने भारतात पहिल्याच दिवशी 68 कोटींची ओपनिंग केली. तर या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात १०० कोटींचा टप्पा पार केला आहे.
'लिओ'च्या या बंपर स्टार्टद्वारे, विजय थलपथी यांनी हे सिद्ध केले आहे की तो दाक्षिणात्य चित्रपटांमधील सर्वांचा आवडता अभिनेता आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी 68 कोटी रुपयांचे रेकॉर्डब्रेक कलेक्शन करणाऱ्या 'लिओ'ने रजनीकांत स्टारर 'जेलर' सारख्या दाक्षिणात्य चित्रपटाला मागे टाकले आहे. तर 'लिओ' च्या पहिल्या दिवसाच्या कमाईच्या तुलनेत, थलपथी विजयने सनी देओल स्टारर 'गदर '2 आणि शाहरुख खानच्या या वर्षातील पहिल्या ब्लॉकबस्टर 'पठाण' चित्रपटाला देखील मागे टाकले आहे. आता हा चित्रपट या विकेंडला म्हणजे शनिवार आणि रविवारी किती कमाई करतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.