Maharashtra Weather Update: मुंबई, ठाण्यासह कोकणात उष्णतेची लाट; तापमानाचा पारा जाणार चाळीशीपार

Mumbai Temperatures Today : भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तापमान आधीच ३८ अंश सेल्सिअस ओलांडले आहे आणि येत्या काही दिवसांत ते ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.
Mumbai Temperatures Today :
Heat wave in Mumbai, Thane and Konkan; Temperatures at 42 degrees in some placessaam tv
Published On
Summary
  • मुंबई, ठाणे आणि कोकणात उष्णतेची लाट येण्याचा इशारा.

  • तापमान काही ठिकाणी ४२ अंश सेल्सिअसपर्यंत नोंद.

  • ९ ते ११ मार्चदरम्यान उष्णतेची तीव्रता वाढण्याची शक्यता

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीत उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा आयएमडीनं दिला आहे. सोमवार ९ मार्च ते ११ मार्चपर्यंत येथे उष्णतेची लाट असणार आहे, येथील तापमान ३८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढले आहे. उष्णतेच्या लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने आधीच वर्तवला होता. त्या अंदाजानुसार आज ठाण्यातील तापमान चाळीशीपार गेले आहे.

Mumbai Temperatures Today :
Weather Update: उन्हाच्या तडाख्याने होतेय अंगाची लाही-लाही; ठाण्यात उष्णतेची लाट, हवामान विभागाचा इशारा

हवामान केंद्रांनी शहराच्या काही भागात ४२.५ अंश सेल्सिअसपर्यंत उच्चांक नोंदवला आहे. कोरडे पूर्वेकडील वारे आणि कमकुवत समुद्री वाऱ्यामुळे उष्णतेची लाट आल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे आणि पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी दरम्यान उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. बुधवार ११ रोजीही येते उष्णतेची लाट असणार आहे. ९ मार्चपासून या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट आहे. दरम्यान ५ मार्च रोजी जारी केलेल्या पहिल्या अलर्टनंतर एका आठवड्यातील हा दुसरा उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार आज मुंबईत ३३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

Mumbai Temperatures Today :
Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

उष्णतेची लाट येण्याचा इशारा कधी दिला जातो?

सलग दोन दिवस कमाल तापमान ३७°C पेक्षा जास्त असल्यास उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला जातो. सोमवारी, कुलाबा आणि सांताक्रूझ येथील IMD वेधशाळांनी किमान तापमान २४°C आणि २१°C (सामान्यपेक्षा १.८°C आणि १.२°C जास्त) नोंदवले. सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३८.४° सेल्सिअस (सामान्यपेक्षा ५.५° सेल्सिअस जास्त) आणि कुलाबा येथे ३५.९° सेल्सिअस (सामान्यपेक्षा २.८° सेल्सिअस जास्त) होते. मुंबईतील सर्वोच्च तापमान राम मंदिर परिसरात ४२° सेल्सिअस आणि विक्रोळी येथे ४१.७° सेल्सिअस नोंदवले गेले, जे उष्णतेच्या लाटेचा सततचा कल दर्शवते.

मार्चच्या सुरुवातीला असामान्य तापमानाची नोंद

मुंबई साधारणपणे १० मार्चच्या सुमारास ३५-३६°C पेक्षा जास्त तापमान ओलांडते, परंतु आयएमडीच्या नोंदीनुसार गेल्या दशकात प्रथमच मार्चच्या पहिल्या आठवड्यात इतकं अधिक तापमानाची नोंद झाली आहे. तापमानातीलवाढ ही पूर्वेकडून येणाऱ्या जोरदार कोरड्या वाऱ्यांमुळे होत आहे.

तर नेहमी थंड समुद्री वारे कमकुवत राहत असल्याने शहरातील वातावरणात गारवा राहणं शक्य नाहीये," असे आयएमडीच्या एका शास्त्रज्ञाने सांगितले. दरम्यान मंगळवार १० मार्च रोजी उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरसाठी येलो अलर्ट देण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com