Sam Bahadur New Song Banda Out: 'सॅम बहादूर'मधलं 'बंदा' गाणं रिलीज, शंकर महादेवन यांच्या आवाजाने जिंकली प्रेक्षकांची मनं

Banda Song Released: या चित्रपटातील 'बंदा' हे नवं गाणे रिलीज झाले असून त्याला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे.
Banda Song Released
Banda Song ReleasedSaam Tv
Published On

Vicky Kaushal Sam Bahadur Movie:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आगामी चित्रपट 'सॅम बहादूर'मुळे (Sam Bahadur) सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून देशातील पहिल्या फिल्ड मार्शलच्या भूमिकेत विकी कौशल दिसणार आहे.

या चित्रपटातील विकी कौशलाचा फर्स्ट लूक, टीझर, ट्रेलर आणि पहिल्या गाण्यानंतर आता या चित्रपटातील दुसरं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच त्यातील गाणी त्यांच्या दमदार संगीतामुळे चर्चेत आली आहेत. या चित्रपटातील 'बंदा' हे नवं गाणे (Banda Song) रिलीज झाले असून त्याला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'सॅम बहादूर'चे 'बंदा' हे गाणं विकी कौशलपासून सुरू होते. या गाण्याच्या माध्यमातून सॅम बहादुरचा देशासाठी काम करण्याचा हेतू दर्शवितो. "ना रुकता है, ना मुडता है, बस चलता रहता है" या गाण्यात मार्शलची भूमिका साकारणारा विकी कौशल तुम्हाला त्याच्यात मानेकशॉ पाहण्यास भाग पाडतो.

बंदा या गाण्यात विकी कौशल सैन्याचे नेतृत्व करताना लढताना दिसतो. तो जखमी होतो आणि त्याला गोळीसुद्धा लागते. तरी देखील तो मागे हटताना दिसत नाही. खंबीरपणे तो लढतान दिसत आहे. चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या सान्या मल्होत्रा ​​आणि फातिमा सना शेख यांचीही झलक या गाण्यामध्ये पाहायला मिळत आहे.

'बढते चलो' नंतर सॅम बहादूरचे दुसरे गाणे 'बंदा' तुम्हाला देशभक्तीसाठी प्रेरित करते. भारतीय लष्कराच्या ताकदीची झलक या गाण्यातून पाहायला मिळते. हे गाणं गुलजार यांनी लिहिले आहे. तर या गाण्याला संगीत शंकर एहसान लॉय यांचे आहे. हे गाणे शंकर महादेवन यांनी आपल्या सुंदर आवाजात गायले आहे.

Banda Song Released
Kartik Aaryan Birthday: कार्तिक आर्यनने 'कटोरी'सोबत साजरा केला वाढदिवस, क्यूट फोटो केला शेअर

भारतीय लष्कराचे फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्या जीवनावर आधारित 'सॅम बहादूर' या चित्रपटासाठी सर्वजण आतुर आहेत. सॅम बहादूर हा विकी कौशल स्टारर चित्रपट आहे. हा चित्रपट भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केला आहे. मेघना गुलजार यांनी भवानी अय्यर आणि शंतनू श्रीवास्तव यांच्यासोबत या चित्रपटाचे सहलेखन केले आहे. हा चित्रपट १ डिसेंबर २०२३ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Banda Song Released
Kartik Aaryan Birthday: कार्तिक आर्यनने 'कटोरी'सोबत साजरा केला वाढदिवस, क्यूट फोटो केला शेअर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com