Vicky Kaushal - Tripti Dimri's Upcoming Film : विकी कौशल - तृप्ती डिमरी पहिल्यांदा एकत्र दिसणार ; करण जोहरच्या नव्या चित्रपटाची घोषणा

Karan Johar Next Bollywood Movie : विकी कौशल त्याच्या आगामी चित्रपटात 'काला' अभिनेत्री तृप्ती डिमरीसोबत दिसणार आहे.
Vicky Kaushal - Tripti Dimri's Upcoming Film
Vicky Kaushal - Tripti Dimri's Upcoming FilmSaam TV

Karan Johar Staring Vicky Kaushal - Tripti Dimri : बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'जरा हटके जरा बचके' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. सारा अली खानसोबतची त्याची ऑन-स्क्रीन जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. चित्रपटाने कलेक्शन देखील चांगले झाले. आता विकी आणखी एका चित्रपटातून पडद्यावर धमाल करण्यासाठी सज्ज आहे.

विकी कौशल त्याच्या आगामी चित्रपटात 'काला' अभिनेत्री तृप्ती डिमरीसोबत दिसणार आहे. करण जोहर निर्मित या चित्रपटाबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. हा चित्रपट पुढील वर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी जाहीर केले आहे की विकी-तृप्ती स्टारर आगामी चित्रपट 23 फेब्रुवारी 2024 रोजी चित्रपटगृहांमध्ये दाखल होईल. (Latest Entertainment News)

Vicky Kaushal - Tripti Dimri's Upcoming Film
Sidhu Moosewala's Chorni Released : मृत्यूनंतर सिद्धू मुसेवालाचे चौथे गाणे प्रदर्शित

तृप्ती डिमरीने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करताना तिची चित्रपटविषयीची उत्सुकता शेअर केली आहे. तिने पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, "हा चित्रपट माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. अशा छान लोकांसोबत काम करण्याचा अनुभव आणि प्रेम यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही. उत्कटता... आनंद... हसू आणि अनेक आठवणी. "23 फेब्रुवारी 2024 रोजी आमच्यासोबत रहा."

अॅमेझॉन प्राइम आणि धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनत असलेल्या या चित्रपटात विकी कौशलसोबत तृप्ती डिमरी आणि पंजाबी अभिनेता एमी विर्क देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याचे दिग्दर्शन आनंद तिवारी करत आहेत. विकी आणि तृप्ती पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. सध्या तरी या चित्रपटाच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही.

करण जोहर अनेक वर्षांनी पुन्हा दिग्दर्शनाकडे वळला आहे. त्याचा रॉकी ओर रानी की प्रेम कहाणी हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. तर तृप्ती डिमरी ऍनिमलमध्ये दिसणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com