Sidhu Moose Wala and Divine’s song Chorni Out : पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर 'चोरनी' हे त्याचे चौथे गाणे प्रदर्शित झाले आहे. रॅपर डिवाइनने हे गाणे प्रदर्शित केले आहे. या गाण्याला यू ट्यूबवर २१.५ मिलियन व्ह्यूज आतापर्यंत (बातमी प्रसिद्ध केली तेव्हा )मिळाले आहेत.
सिद्धू मुसेवालाची जुनी शैली नव्या गाण्यात पाहायला मिळते. या गाण्याच्या व्हिडिओमध्ये व्हीएफएक्सचा वापर करण्यात आला आहे. तसेच आपल्याला सिद्धू मुसेवाला देखील या गाण्यामध्ये पाहायला मिळत आहे. हे गाणे मुंबईत शहरावर आधारित आहे. (Latest Entertainment News)
वादात सापडल्यानंतर सरकारने SYL गाण्यावर बंदी घातली होती. मुसेवालाचे तिसरे गाणे 'मेरा ना' 7 एप्रिल 2023 रोजी लाँच झाले. ज्याला एका तासात 20 लाख व्ह्यूज मिळाले आणि 7 लाख लोकांनी गाणे लाइक केले आणि 1.5 लाख कमेंट्स केल्या होत्या.
चोरनी या गाण्यातील त्याच्या रॅपमध्ये, डिव्हाईनने सिद्धूला श्रद्धांजली वाहिली आहे. सिद्धू यांच्याकडून खरा हिप-हॉप शिकला. या गाण्यात दिवंगत दिग्गज गायिका (Singer) लता मंगेशकर यांच्या चोरनी हू मैं या गाण्याचा वापर केला आहे.
सिद्धू मुसेवालाचे नवीन गाणे नवकरण ब्रारने दिग्दर्शित आणि एडिट केले आहे. तर डिव्हाईन या गाण्यात रॅप गायला आहे. व्हीएफएक्स आणि मोशन ग्राफिक्सचा वापर करून गाण्यामध्ये सिद्धू मुसेवालाल या गाण्यात जीवदान दिल आहे.
मुसेवाल्याच्या चाहत्यांना या यामुळे खूप आनंदी आहेत. कमेंट करून सिद्धू मुसेवाला अमर आहे असे सांगत आहेत. तसेच डिव्हाईनने गाण्याला न्याय दिला असल्याचे देखील म्हणत आहेत.
पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांची 29 मे 2022 रोजी पंजाबच्या मानसा जिल्ह्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. चोरनी हे त्यांचे चौथे मरणोत्तर-रिलीज झालेले गाणे आहे.
जून 2022 मध्ये, त्याच्या मृत्यूच्या जवळपास एक महिन्यानंतर, SYL हे गाणे रिलीज झाले होते परंतु नंतर ते व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर ब्लॉक करण्यात आले होते. नोव्हेंबरमध्ये वार हे गाणे रिलीज झाले. त्याचा शेवटचा रिलीज होता मेरा ना. या वर्षी एप्रिलमध्ये रिलीज झाले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.