Netizens Warn Akshay Kumar : प्रभास स्टारर 'आदिपुरुष' या चित्रपटात हिंदू देवतांना आक्षेपार्ह पद्धतीने दाखवल्याबद्दल उच्च न्यायालयाने चित्रपट निर्माते आणि सेन्सॉर बोर्ड फटकारले आहे. या चित्रपटात प्रभासने रामाची भूमिका साकारली होती.
अक्षय कुमार देखील त्याच्या आगामी चित्रपटामध्ये देवाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या चित्रपटातील लुक पाहून नेटकऱ्यांनी त्याला आधीच सावध केले आहे. जर तुम्हाला आठवत असेल तर 'ओएमजी' हा एक विनोदी चित्रपट होता, जो एका नास्तीक व्यक्तीवर आधारित होता.
अलीकडेच अक्षय कुमारने त्याच्या आगामी 'OMG 2' चित्रपटातील त्याचा लूक शेअर केला आहे. या फोटोमध्ये अक्षय कुमार काळ्या रंगाच्या स्लीव्हलेस टी-शर्टमध्ये त्रिपुंड, भस्म, जटा, रुद्राक्ष माळांसह दिसत आहे.
अक्षय कुमारला शंकराच्या अवतारात पाहून लोकांनी त्याला सल्ले देण्यास सुरुवात केली आहे. अक्षयने त्याच्या पोस्टमध्ये सांगितले आहे की, त्याचा चित्रपट 11 ऑगस्टला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा टीजर मंगळवारी म्हणजेच 11 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारचे 'ओएमजी २'चे पोस्टर नेटकऱ्यांनी त्याला सावध केले आहे.
अक्षयच्या या पोस्टवर एका युजरने लिहिले आहे की, 'हिंदू धर्माचे चुकीचे वर्णन करण्याचा प्रयत्न केला गेला तर ते खपवून घेतले जाणार नाही. मागील चित्रपटात सहन केले पण यावेळी नाही, जय श्री राम.
आणखी एका युजरने म्हटले - सनातन धर्माचा कुठेही अपमान झाला तर निकाल निष्पक्ष होणार नाही, लक्षात ठेवा. तर अजून एका नेटकाऱ्याने कमेंट केली आहे, 'यावेळी सनातन धर्म आणि देवतांची चेष्टा करू नका, खिलाडी कुमार हे समजून घे?
OMG 1 हिंदू धर्माच्या विरोधात होता, मला आशा आहे की हा चित्रपट चांगले असेल. 'अब आया ना लाइन पे, मग तुम्ही म्हणत होता की शंकराला दूध का अर्पण करता, आम्हाला विश्वास आहे की ज्याला जे करावेसे वाटेल तो ते करेल, अशा कमेंट अक्षय कुमारच्या पोस्टरवर येत आहेत.
अमित राय यांनी अक्षय कुमारच्या 'OMG 2' चे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी, यामी गौतम आणि अरुण गोविल यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट 11 ऑगस्टला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Latest Entertainment News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.