Amitabh Bachchan Share Project K Update : सॅन दिएगो कॉमिक कॉनमध्ये दिसणार Project K ; अमिताभ बच्चन-दीपिकाने शेअर केली मोठी अपडेट

Project K Debut : सॅन दिएगो कॉमिक कॉन या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात जाणारा हा पहिला भारतीय चित्रपट आहे.
Project K Is the First Indian Film To debut at Comic-Con
Project K Is the First Indian Film To debut at Comic-Con Saam TV
Published On

Project k Release Date Reveal At International Event : प्रभास सध्या त्याच्या आगामी 'प्रोजेक्ट के' चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. सॅन दिएगो कॉमिक कॉनच्या इव्हेंटमध्ये प्रदर्शनाची तारीख संपूर्ण टीमसह जाहीर करण्यात येणार आहे.

'प्रोजेक्ट के' हा एक बिग बजेट सिनेमा आहे. प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल खूप उत्सुकता आहे. चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची प्रेक्षक वाट पाहत आहे. तर लवकरत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात येणार आहे.

१९ जुलैला होणाऱ्या सॅन दिएगो कॉमिक कॉन या कार्यक्रमात चित्रपटाची तारखेची घोषणा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात येणार आहे. सॅन दिएगो कॉमिक कॉन या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात जाणारा हा पहिला भारतीय चित्रपट आहे. (Latest Entertainment News)

Project K Is the First Indian Film To debut at Comic-Con
Madhuri Pawar Share Post : दारूच्या नशेत वडिलांनी आईला मारण्यासाठी... मराठी अभिनेत्रीने सांगितली ती आठवण

वैजयंती चित्रपट या निर्मिती संस्थेने अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन प्रभासचे खास पोस्टर शेअर करून ही मोठी घोषणा केली आहे. एसडीडी सेलिब्रेशनची सुरुवात 20 जुलै रोजी राष्ट्रीय पुरस्कार विजेते नाग चैतन्य यांच्यासोबत करण्यात येणार आहे. चित्रपटाची संपूर्ण टीम या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.

या चित्रपटाचे पोस्टर महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरुन शेअर केले आहे.'तेलुगू सिनेमातील भाग होण्याचा आणि 'प्रोजेक्ट के' या आयकॉनिक चित्रपटामध्ये प्रभाससोबत एकाच फ्रेममध्ये दिसण्याचा बहुमान मला मिळाला आहे.

तुम्हा सर्वांचे आभार. आणि नाग सर, माझा विचार केल्याबद्दल धन्यवाद.. प्रभासने मला दाखवलेली नम्रता, आदर आणि काळजी खूप हृदयस्पर्शी आणि भावनिक आहे. माझ्यासाठी नाही तर 'प्रोजेक्ट के'मध्ये सहभागी असलेल्या सर्वांसाठी, तुमची मेहनत खूप यश प्राप्त करेल.. प्रेम आणि प्रार्थना'.असे ट्विट अमिताभ बच्चन यांनी केले आहे.

तर दीपिकानेही पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.'मला अभिमान आहे की 'प्रोजेक्ट के' हा पहिला भारतीय चित्रपट आहे की, ज्याच्या प्रदर्शनाची तारीख सॅन दिएगो कॉमिक कॉन या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात जाहीर करण्यात येणार आहे', असे कॅप्शनही तिने दिले आहे. या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

'प्रोजेक्ट के' हा बजहुचर्चित सिनेमाने प्रेक्षकाची उत्सुकता वाढवली आहे. चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन,कमल हसन,प्रभास, दिपीका पदुकोन अशी स्टारकास्ट झळकणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com