Famous Actor  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Famous Actor : "घटस्फोट होत नाही, तोवर अभिनय करणार नाही"; प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, काळी जादू केल्याचा बायकोवर आरोप

Ravi Mohan Divorce Case : प्रसिद्ध अभिनेत्याने इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला आहे. तसेच बायकोसह सासरच्यांवर गंभीर आरोप केले आहे. अभिनेत्याचा बायकोसोबत लवकरच घटस्फोट होणार आहे, नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

प्रसिद्ध अभिनेता घटस्फोट घेत आहे.

अभिनेत्याने काळी जादू केल्याचा आरोप बायकोवर केला आहे.

तसेच अभिनेत्याने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला आहे.

साऊथ अभिनेता रवी मोहन सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. अभिनेत्याला इंडस्ट्रीत 'जयम रवि' या नावाने ओळखले जाते. शनिवारी चेन्नई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अभिनेता खूप भावुक झाले त्याने अनेक गोष्टींचा खुलासा केला. रडत रडत अभिनेता म्हणाला की, "जोवर घटस्फोट होत नाही तोपर्यंत अभिनय करणार नाही..."

अभिनेता रवी मोहन सध्या घटस्फोट घेण्याच्या प्रक्रियेतून जात आहे. त्याच्या बायकोचे नाव आरती असे आहे. रवी मोहन आणि आरती २००९ मध्ये लग्न बंधनात अडकले होते. अभिनेत्याने खुलासा केला की, "अनेक वर्षे विनाकारण सासरच्या मंडळींकडून अपमान आणि छळ सहन करावा लागला..." पुढे करिअरच्या या टप्प्यावर अभिनय का सोडत आहात, असे माध्यमांनी विचारल्यावर रवीने स्पष्ट सांगितले की, गेल्या दोन वर्षांपासून सतत होणारे ट्रोलिंगमुळे मी मानसिकदृष्ट्या खचून गेला आहे. त्यामुळे जोपर्यंत माझा कायदेशीर घटस्फोट होत नाही, तोपर्यंत मी कोणत्याही चित्रपटात काम करणार नाही. ज्या दिवशी माझा घटस्फोट होईल, त्या दिवशी माझे आयुष्य पुन्हा रुळावर येईल. हे सायबरबुलिंग थांबताच मी पुन्हा कॅमेऱ्यासमोर येईन..."

अभिनेत्याने सांगितल्याप्रमाणे, लोक अनेकदा त्याच्या सरळ आणि शांत स्वभावाचा गैरफायदा घेतात, पण आता त्याचा संयम संपला आहे. रवीने असाही दावा केला आहे की, त्याची पत्नी आणि सासरचे लोक त्याला 'गुलाम' म्हणून ठेवत असल्याचे सर्व पुरावे त्याच्याकडे आहेत. रवी मोहनला त्याच्या मुलांना म्हणजे आरव आणि अयान यांनाही भेटू दिले जात नाही.

पत्नीवर काळी जादू केल्याचा आरोप

रवी मोहनने पत्नी आरतीवर अनेक गंभीर आरोप केले. पत्नी आपल्यावर काळी जादू करत असल्याचा दावा अभिनेत्याने केला आहे. त्याला रक्ताच्या उलट्या होत होत्या. यापूर्वीही असे घडले असल्याचे त्याने सांगितले. आरतीने आपल्याला ब्लॅकमेल केल्याचा आरोप करत तो ओरडला. काळी जादूमुळे अभिनेत्याला शारीरिक आणि मानसिक त्रास होत आहे.

रवी मोहनचे करिअर

रवी मोहनने आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आहे. त्याने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. रवी मोहन एक दिग्दर्शक आणि निर्माता आहे. तो तमिळ चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. २००३ साली प्रदर्शित झालेल्या आणि गाजलेल्या 'जयम' या चित्रपटाद्वारे त्याने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. 'एम. कुमारन एस/ओ ​​महालक्ष्मी', 'बोम्मारिल्लू', 'थानी ओरुवन' आणि 'पेरण्मै' हे त्याचे गाजलेले चित्रपट आहे. चाहते अभिनेत्याला पुन्हा एकदा चित्रपटात पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Ireland 1st T20I: भारताचा आयर्लंडकडून पहिल्यांदाच पराभव, 'या' ५ कारणामुळे सामन्यासह टीम इंडियानं गमवाली टी-२० मालिका

महसुलात 20 हजार कोटींचा घोटाळा? मुद्रांक शुल्कावर अधिकाऱ्यांचा डल्ला

Beijing Plane Crash: सर्वात उंच इमारतीला विमान धडकलं; थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

लोहगड हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, सिया-चेतनचं प्रेम, खुनानंतर ब्लेम गेम, केतनला टक्कल, नात्यात दुराव्याचं कारण?

Maharashtra News Live Update: यवतमाळ शहरात मुसळधार पावसाला सुरूवात

SCROLL FOR NEXT