

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयचा घटस्फोट
सूरज नांबियार आणि मौनी रॉयने सोशल मीडियावर पोस्ट केली
मौनी रॉयने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत सांगितले कारण
बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉयचा घटस्फोट झाला. मौनी रॉय आणि तिचा नवरा सूरज नांबियार यांचा ४ वर्षांचा सुखी संसार तुटला. गेल्या काही दिवसांपासून मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांच्या घटस्फोटाबाबत चर्चा होत होती. त्यांच्या वैवाहिक जीवनातील अडचणींबाबत बोलले जात होते. या अफवा आहेत की सत्य आहे यावरून मौनीचे चाहते चिंतेत होते. पण आज अखेर मौनी रॉयने सोशल मीडियावर पोस्ट करत यावर स्पष्टीकरण दिले आहे. मौनीने सूरज आणि तिचा घटस्फोट होत असल्याचे सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, मौनी आणि सूरज यांचा घटस्फोट होत असून त्यांचा ४ वर्षांचा संसार तुटला आहे. या कपलने एका संयुक्त निवेदनातून याला दुजोरा दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावर भली मोठी पोस्ट करत घटस्फोट घेत असल्याचे सांगितले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी घटस्फोटामागचं कारण देखील सांगितले आहे. हे वृत्त समोर येताच मौनीचे चाहते चिंतेत आले आहेत.
मौनी आणि सूरज गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या आणि घटस्फोटाच्या बातम्या सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहेत. अशातच मौनी रॉय आणि सूरज नांबीयारने एक नवीन निवेदन जारी करून या वृत्तांवर मौन सोडले आहे. मौनी आणि सूरजने त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक संयुक्त निवेदन शेअर केले आहे.
मौनी आणि सूरजने या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, 'माध्यमांमधील काही सदस्य आमच्या वैयक्तिक आयुष्यात प्रमाणापेक्षा जास्त ढवळाढवळ करत असल्याचे पाहून आम्हाला खूपच दुःख झाले आहे. आम्ही हे सांगू इच्छितो की, आम्ही परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे आणि हा काळ शांततेने आणि खासगीरित्या घालवत आहोत.
तसंच, 'आमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खोट्या गोष्टी पसरवण्यात आल्या आहेत ज्या आमच्या नात्यातील सत्य दर्शवत नाहीत. खूप विचारविनिमय केल्यानंतर आणि प्राधान्यक्रम बदलल्यानंतर आम्ही एकमेकांचा आदरपूर्वक आणि विचारपूर्वक आपापल्या मार्गाने पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे.', असे मौनी आणि सूरजने सांगितले.
या कपलने पुढे असे देखील सांगितले की, सध्या आम्ही हा काळ अत्यंत संयमाने आणि खासगीरित्या घालवण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. भविष्यातही आमची मैत्री टिकवून ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करू. आमच्या गोपनीयतेचा आदर केल्याबद्दल आणि या काळात सतत पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही सर्वांचे मनापासून आभार मानत आहोत.'
दरम्यान, मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांनी २०२२ मध्य लग्न केले होते. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर या कपलने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्यात दुरावा आला. मौनी आणि सूरजने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दोघांचे सोबत असलेले फोटो डिलीट केले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.