Bollywood Actress : १६ वर्ष बॉलिवूडमध्ये काम केले; अभिनेत्रीने आता भारत सोडला, नेमकं कारण काय?

Bollywood Actress Leave India After 16 Years : प्रसिद्ध अभिनेत्रीने १६ वर्षांनी भारत सोडला. तिने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट केले आहे. तिच्या या निर्णयाचे कारण, जाणून घेऊयात.
Bollywood Actress Leave India After 16 Years
Bollywood ActressSAAM TV
Published On
Summary

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने भारत सोडला.

अभिनेत्री बिग बॉसची स्पर्धक होती.

अभिनेत्रीने तब्बल १६ वर्षांनी भारत सोडला.

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने मोठा निर्णय घेतला आहे. अभिनेत्रीनेही भारत कायमचा सोडल्याचे सांगितले आहे. तब्बल १६ वर्ष भारतात राहिल्यानंतर तिने आता मोठा निर्णय घेतला. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून मंदाना करीमी (Mandana Karimi) आहे.

नुकतेच मंदाना करीमीने इन्स्टाग्रामवर (Ask Me Anything - मला काहीही विचारा) अशी पोस्ट टाकली होती. तेव्हा एका चाहत्याने तिला विचारले की, "तू मुंबई कायमची सोडून दिली आहेस का? तुला या शहराची आठवण येते का?" या प्रश्नाचे उत्तर देत अभिनेत्री म्हणाली की, "मी असे काही म्हणेन किंवा असा क्षण येईल, याची मी कधीच कल्पना केली नव्हती किंवा माझा त्यावर विश्वासही बसला नसता; पण... निरोप, भारत!"

मंदाना करीमीने पुढे म्हटले की, "हे खूप कठीण आहे. पण भारतात जवळपास १६ वर्षे घालवल्यानंतर, अखेर... मी माझे 'दुसरे घर' मागे सोडून जात आहे आणि आता नव्या सुरुवातींकडे वाटचाल! नवा देश, नवे घर, सर्व काही नवे..." तिच्या या उत्तराने चाहते खूपच भावुक झाले आहेत. यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंदाना करीमीने सांगितले होते की, सुरक्षेच्या कारणास्तव ती भारत सोडण्याचा विचार करत आहे.

Bollywood Actress Leave India After 16 Years
Famous Singer : प्रसिद्ध गायकाच्या मॅनेजरच्या घरावर गोळीबार, बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; सिनेसृष्टीत खळबळ

मंदाना करीमी हिचा जन्म इराण मध्ये झाला. तिने आपल्या करिअरची सुरूवात मॉडेलिंगपासून केली. 2015 मध्ये रिलीज झालेल्या 'भाग जॉनी' चित्रपटातून अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. तिने लोकप्रिय रिॲलिटी शो 'बिग बॉस' च्या नवव्या पर्वात सहभागी झाली होती. ज्यामुळे अभिनेत्री घराघरात पोहोचली आणि एक ओळखीचा चेहरा बनली. २०१५ मध्ये पार पडलेल्या या शोच्या पर्वात ती 'दुसरी उपविजेती'ठरली होती.२०२२ मध्ये आलेल्या 'लॉक अप' या आणखी एका रिॲलिटी शोमध्येही मंदाना करीमी दिसली.

Bollywood Actress Leave India After 16 Years
Famous Actress Death : प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, सिनेसृष्टी शोक सागरात बुडाली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com