Rashmika Mandanna Birthday : नॅशनल क्रश रश्मिका मंदाना कितवी शिकलीय?

Shreya Maskar

रश्मिका मंदाना वाढदिवस

आज (५ एप्रिल) 'श्रीवल्ली' रश्मिका मंदानाचा वाढदिवस आहे. रश्मिका मंदाना आता ३० वर्षांची झाली आहे. नुकतीच रश्मिका मंदाना साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत लग्नगाठ बांधली.

Rashmika Mandanna's Birthday | instagram

अभिनय क्षेत्र

रश्मिका मंदान्नाने ऋषभ शेट्टी दिग्दर्शित, २०१६ मधील कन्नड भाषेतील 'किरिक पार्टी' या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात एन्ट्री घेतली.

Acting | instagram

शालेय शिक्षण

रश्मिका मंदान्ना यांनी तिचे सुरुवातीचे शालेय शिक्षण कर्नाटक येथील कुर्ग पब्लिक स्कूल (COPS) येथे पूर्ण केले. त्यानंतर तिने 'म्हैसूर इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स'मधून तिचा प्री-युनिव्हर्सिटी अभ्यासक्रम पूर्ण केला.

Schooling | instagram

कॉलेज लाइफ

रश्मिकाने बंगळूरुमधील 'रामाया कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स'मधून मानसशास्त्र, पत्रकारिता आणि इंग्रजी साहित्यामध्ये पदवी प्राप्त केली आहे.

College Life | instagram

पुरस्कार

रश्मिका मंदान्नाने २०१४ मध्ये राष्ट्रीय स्तरावरील 'क्लीन अँड क्लियर टाइम्स फ्रेश फेस' विजेतेपद पटकावले. ती नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते.

Awards | instagram

बॉलिवूडमध्ये पदार्पण

रश्मिका मंदान्नाने २०२२ मधील 'मिशन मजनू' या स्पाय थ्रिलर चित्रपटाद्वारे सिद्धार्थ मल्होत्रासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Bollywood Debut | instagram

सुपरहिट चित्रपट

रश्मिका मंदान्नाच्या सुपरहिट चित्रपटांच्या यादीत पुष्पा, ॲनिमल, छावा, गीता गोविंदम , सीता रामम्, डियर कॉम्रेड यांचा समावेश आहे.

Superhit Films | instagram

रश्मिका मंदाना लग्नगाठ

रश्मिका आणि विजय 26 फेब्रुवारीला उदयपूरमध्ये लग्न बंधनात अडकले. 'विरोश'ने ऑक्टोबर 2025 मध्ये हैदराबादमध्ये साखरपुडा केला.

Rashmika Mandanna Ties the Knot | instagram

NEXT : रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये कोण कोणती भूमिका साकारणार? माता सीतेच्या लूकनं वेधलं लक्ष

Ramayana Cast | saam tv
येथे क्लिक करा...