Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर खंडाळा घाट उतरताना मिनी बस उलटली, मंकी हिल परिसरात अपघात

Khandala ghat accident news : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मंकी हिल परिसरात मिनी बस पलटी होऊन ८ प्रवासी जखमी झाले. जखमींवर खोपोली रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Mumbai Pune bus accident
A mini bus overturned near Monkey Hill on the Mumbai-Pune Expressway, leaving several passengers injured.Saam tv marathi
Published On

दिलीप कांबळे, मावळ प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Mumbai Pune Expressway accident News : मुंबई-पुणे महामार्गावरील बोरघाटात मंकी हिल परिसरात एका मिनी बसचा भीषण अपघात झाला आहे. मंकी हिल येथील बॅटरी पॉईंटजवळ मिनी बस उलटल्याची घटना घडली. या अपघातात आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. (Mini bus accident near Monkey Hill today, Mumbai Pune Expressway latest accident)

हा अपघात खंडाळा घाट उतरताना अमृतांजन पुलाच्या वरच्या बाजूला, जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील 'एचओसी' (HOC) ब्रिज परिसरात घडला. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता. घटनेची माहिती मिळताच आयआरबी (IRB) प्रशासन, खासगी रुग्णवाहिका तसेच 'देवदूत' यंत्रणेसह स्थानिक मदत पथकाचे सदस्य तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

Mumbai Pune bus accident
मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; मंत्र्यांच्या प्रवासावर निर्बंध, वर्क फ्रॉम होमवर चर्चा

जखमींना तातडीने उपचारासाठी खोपोली नगरपरिषद रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने, यातील ६ ते ७ प्रवासी किरकोळ जखमी असून सर्व जखमी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील 'शेळके पाडा' परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

जखमींची नावे :

१. कस्तुरी गणेश माळी (वय १५)

२. कमलाबाई रामचंद्र माळी (वय ७०)

३. गुरुनाथ जयराम डोंगरे (वय ५५)

४. मीनाबाई गुरुनाथ डोंगरे

५. गुलाबबाई दत्तात्रय हुमणे

६. रवींद्र रामचंद्र माळी (वय ५०)

७. अशोक जयराम डोंगरे (वय ६०)

Mumbai Pune bus accident
SSC-HSC Supplementary Exam: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

नाशिक-मालेगाव महामार्गावर बसचा भीषण अपघात; चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने बस उलटली

मुंबई-आग्रा महामार्गावर शहादा डेपोच्या बसला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. उमराणे शिवारात चालकाला चालत्या बसमध्ये हृदयविकाराचा झटका आल्याने हा अपघात झाला. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, शहादा डेपोची ही बस नाशिकहून मालेगावाकडे जात होती. उमराणे शिवारात बस आली असता, अचानक चालकाच्या छातीत दुखू लागले आणि त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यामुळे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस महामार्गालगतच्या झाडावर जाऊन आदळली व पलटी झाली.

या बसमध्ये प्रवासी होते, त्यापैकी ४ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. जखमी प्रवाशांना प्रथमोपचारासाठी मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हृदयविकाराचा झटका आलेल्या बस चालकाला तातडीने मालेगावमधील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

Mumbai Pune bus accident
Prateek Yadav : अखिलेश यादव यांच्या धाकट्या भावाचे निधन; वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, नेमकं कारण अस्पष्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com