Bollywood Famous Actor : डबल रोल नव्हे, प्रसिद्ध अभिनेत्याच्या एकाच चित्रपटात ६ भूमिका; बॉक्स ऑफिसवरही घातलाय धुमाकूळ

Famous Actor Played 6 Roles In One Movie : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याने एकाच चित्रपटात तब्बल ६ भूमिका साकारल्या. त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट देखील ठरला.
Famous Actor Played 6 Roles In One Movie
Bollywood Famous ActorSAAM TV
Published On
Summary

चित्रपटात दुहेरी भूमिका साकारणे हे कॉमन झाले आहे.

प्रसिद्ध अभिनेत्याने मात्र एकाच चित्रपटात ६ भूमिका साकारल्या आहेत.

अभिनेत्याने आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांना भरपूर हसवले.

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंदा गेल्याकाही वेळापासून आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. गोविंदा बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आहे. आजवर त्याने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या अभिनयाचे आणि स्टाइलचे लाखो चाहते आहेत. आपण चित्रपटांमध्ये अनेकदा कलाकारांना दुहेरी भूमिका साकारताना दिसतो. मात्र गोविंदा असा अभिनेता आहे, ज्याने एकच चित्रपटात एक नाही , दोन नाही तर तब्बल सहा भूमिका साकारल्या होत्या.

चित्रपटाचे नाव काय?

गोविंदाने 2000 साली रिलीज झालेल्या 'हद कर दी आपने' या चित्रपटात तब्बल सहा भूमिका/ पात्र साकारले. प्रेक्षकांनी गोविंदाला भरपूर प्रेम दिले. चित्रपटात गोविंदासोबत बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी देखील झळकली आहे. 'हद कर दी आपने' हा एक कॉमेडी चित्रपट होता. मीडिया रिपोर्टनुसार, 'हद कर दी आपने' चित्रपट 7–8 कोटींमध्ये बनला होता. चित्रपटाचे वर्ल्डवाइड कलेक्शन 19.02 कोटी रुपये झाले तर इंडिया नेट कमाई 11.14 कोटी झाली.

'हद कर दी आपने' चित्रपटात गोविंदाच्या भूमिका

  1. राज मल्होत्रा ​​(राजू) - मुख्य पात्र, एक गुप्तहेर

  2. राजचे वडील

  3. राजची आई

  4. राजचे आजोबा

  5. राजची आजी

  6. राजची बहीण

'हद कर दी आपने' चित्रपटाचे मनोज अग्रवाल दिग्दर्शक होते. सतीश जैन, राजीव कौल आणि अन्वर खान यांनी चित्रपटाचे लेखन केले. या चित्रपटात गोविंदा, राणी मुखर्जीसोबत आणखी तगडी स्टार कास्ट पाहायला मिळाली. यात परेश रावल, राकेश बेदी, जॉनी लिव्हर, सतीश कौशिक, टिन्नू आनंद, अवतार गिल आणि विजू खोटे यांसारखे कलाकारही होते.गोविंदाने चित्रपटात सहा पात्रे साकारली होती, तर जॉनी लिव्हर यांनीही दुहेरी भूमिका साकारली होती. त्यांनी वडील आणि मुलगा अशा दोन्ही भूमिका साकारल्या होत्या.

Famous Actor Played 6 Roles In One Movie
Mumbai Drug Party: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला अटक; बँक खात्यातून 7 महिन्यात 50 लाखांची उलाढाल, काय आहे संपूर्ण प्रकरण?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com