Mumbai Drug Party: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला अटक; बँक खात्यातून 7 महिन्यात 50 लाखांची उलाढाल, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Mumbai Drug Party Update : नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अभिनेत्रीच्या खात्यातून 7 महिन्यात 50 लाखांचे व्यवहार झाले असल्याचे समोर आले आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.
Mumbai Drug Party Update
Mumbai Drug Party:saam tv
Published On
Summary

मुंबईच्या नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट समोर आली.

अभिनेत्रीच्या बँक खात्यातून गेल्या 7 महिन्यात 50 लाखांहून अधिक रकमेची देवाणघेवाण झाल्याचे समोर आले.

तसेच अभिनेत्रीचा सहआरोपीसोबत संशयास्पद संवाद सुरू असल्याची माहिती मिळाली.

बॉलिवूड सध्या ड्रग्ज पार्टीमुळे पुन्हा एकदा चांगलेच चर्चेत आले आहे. गोरेगाव नेस्को सेंटरमधील ड्रग्ज पार्टी प्रकरणात पोलीसांनी मोठी कारवाई केली. या प्रकरणात बॉलिवूडच्या अभिनेत्रीला अटक करण्यात आली आहे. अभिनेत्रीचे नाव जिया रेवळ प्रदीप जेकब असे आहे. ही इंडस्ट्रीत साईड एक्टर म्हणून काम करते. जिया ही ड्रग्ज तस्करी करणाऱ्या टोळीच्या संपर्कात होती. ड्रग्ज पेमेन्ट तिच्या बँक खात्यातून होत असल्याचे उघड झाले आहे.

नेस्को सेंटरमधील ड्रग्ज पार्टी प्रकरणात जियाच्या बँक खात्यात गेल्या सात महिन्यांत ५० लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचे मोठे आर्थिक व्यवहार उघडकीस आणले आहेत. पोलिसांच्या सूत्रांनी उघड केले की, जियाचे सहआरोपी आयुष साहित्यसोबत वारंवार आर्थिक व्यवहार होत असत आणि व्हॉट्सॲप व स्नॅपचॅटवर त्यांचे कॉल आणि मेसेज असायचे.

बँक स्टेटमेंटच्या अधिक तपासणीतून जिया आणि आनंद पटेल, विनीत गेरेलानी आणि शुभ अग्रवाल यांच्यासह इतर आरोपींमध्येही आर्थिक संबंध असल्याचे समोर आले आहे. चौकशीदरम्यान, साहित्यने जियाच्या लिव्ह-इन पार्टनरचे नाव उघड केले, तो फक्त 'मार्क' या नावाने ओळखला जातो असे त्याने सांगितले. साहित्यने पुढे सांगितले की, तो मार्ककडून ड्रग्स मिळवत असे आणि त्याचे पैसे झियाच्या बँक खात्यात पाठवत असे. सध्या मार्कचा कोणाशीही संबंध नाही. तो देशाबाहेर पळून गेला असावा, असा पोलिसांना संशय आहे.

नेस्को सेंटरमधील ड्रग्ज पार्टी प्रकरणात आयुषकडून ९३३ ड्रग्ज गोळ्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. सुमारे १५.३९ लाख रुपयांच्या या गोळ्यांमध्ये विविध रंगांच्या टॅबलेट्सचा समावेश आहे. पोलीस या प्रकरणाचा खोलवर तपास घेत आहे.

Mumbai Drug Party Update
Famous Actress Wedding : प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई; हातावर रंगली मेहंदी, होणाऱ्या नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com