Famous Actress Wedding : प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई; हातावर रंगली मेहंदी, होणाऱ्या नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो व्हायरल

Famous Actress Mehndi Ceremony Photos : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. नुकताच मेहंदी सोहळा पार पडला. सुंदर फोटो पाहा.
Famous Actress Mehndi Ceremony Photos
Famous Actress Weddingsaam tv
Published On
Summary

टिव्ही मालिकांमधून प्रेक्षकांच्या घरात पोहचलेली अभिनेत्री लवकरच लग्न बंधनात अडकणार.

अभिनेत्रीच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत.

गेल्यावर्षी अभिनेत्रीने आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.

मनोरंजन विश्वातून आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या घरी लगीन घाई पाहायला मिळत आहे. 'तुला पाहते रे' फेम अभिनेत्री गायत्री दातार लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरूवात झाली आहे. गेल्यावर्षी म्हणजेच २५ डिसेंबर २०२५ ला सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करून गायत्रीने आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.

केळवण, ग्रहमख विधीनंतर आता गायत्री दातारच्या मेहंदी सोहळ्याचे सुंदर फोटो समोर आले आहेत. यात ती होणाऱ्या नवऱ्यासोबत रोमँटिक पोज देताना दिसत आहे. गायत्री दातारच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव श्रीकांत चवारे असे आहे. गायत्रीच्या हातावर श्रीकांतच्या नावाची मेहंदी रंगली. गायत्रीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये दोघे खूप आनंदी आणि सुंदर दिसत आहे.

गायत्री दातारने मेहंदीसाठी फ्लोरल प्रिंट असलेला मेहंदी कलरचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे. केसात फुल माळले आहे. मिनिमल मेकअप आणि मॅचिंग ज्वेलरीसोबत तिने हा लूक पूर्ण केला आहे. तर श्रीकांतने कुर्ता-पजामा आणि त्यावर गायत्रीच्या ड्रेसला मॅचिंग असे जॅकेट परिधान केले आहे. त्यांच्या फोटोंवर चाहते आणि कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. गायत्री आणि श्रीकांतची लव्हस्टोरी अगदी फिल्मी आहे. दोघांची ओळख एका डेटिंग अ‍ॅपवर झाली होती.

गायत्री दातारचा होणारा नवरा कोण?

गायत्री दातारच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव श्रीकांत चवारे असे आहे. त्याने IIT Bombay मधून शिक्षण पूर्ण केले आहे. तो ड्रोन फोटोग्राफरही आहे. त्याला ट्रॅव्हल आणि फोटोग्राफीची आवड आहे.

गायत्री दातार वर्कफ्रंट

गायत्री दातारने आजवर अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे. तिची 'तुला पाहते रे' ही मालिका खूप गाजली. ती 'बिग बॉस मराठी' देखील झळकली. 'अबीर गुलाल' या मालिकेत दिसली.

Famous Actress Mehndi Ceremony Photos
Famous Photographer Death : प्रसिद्ध छायाचित्रकार काळाच्या पडद्याआड; दीर्घकालीन आजाराने निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com