Manasvi Choudhary
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रीपैकी एक गायत्री दातार लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
सोशल मीडियावर गायत्रीने काही खास फोटो शेअर केले आहेत. गायत्री दातारचा साखरपुडा झाला आहे.
ं
गायत्रीचे फोटो पाहताच चाहत्यांनाही आनंद झाला आहे. सोशल मीडियावर गायत्रीच्या फोटोंवर अनेक सेलिब्रिटींसह नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.
या फोटोमध्ये गायत्री तिच्या पार्टनरसोबत दिसत आहे. दोघेही एकमेकांकडे बघत आहेत. गायत्रीच्या या फोटोमध्ये हातातील अंगठी दिसत आहे त्यामुळे गायत्रीने साखरपुडा केलं असल्याचं स्पष्ट होत आहे.
'
माझ्या आयुष्यात हिरोची एन्ट्री झाली आहे...' असं गायत्रीने तिच्या फोटोंना कॅप्शन दिलं आहे.
गायत्रीने पार्टनरसोबतचा फोटो पोस्ट केला असला तरी त्याचं चेहरा स्पष्ट दिसत नाही यावरून अभिनेत्री गायत्री दातारचा नवरा कोण आहे याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान गायत्री कधी आणि कशी ओळख करून देणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.