Manasvi Choudhary
हिंदू संस्कृतीत टिकलीला विशेष महत्व आहे. स्त्रियांच्या १६ साजश्रृगांरापैकी एक म्हणजे टिकली.
फार पूर्वीपासून महिला आपल्या कपाळावर टिकली लावतात आजही पद्धत सुरू आहे.
चंद्रकोर टिकली ही मराठमोळ्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. शिवकालीन काळापासून संत, राजे आणि योद्धे कपाळावर चंद्रकोर लावायचे.
यानंतर कपाळावर महिला लाल कुंकूवाची मोठी टिकली लावायच्या. आता बाजारात वेगवेगळ्या रंगाच्या फॅशनेबल डिझाइनच्या टिकल्या आल्या आहेत.
ड्रेस, साडीवर मॅचिंग टिकली तुम्ही लावू शकता यामुळे सौंदर्य अधिकच खुलून येईल.
अंडाकृती, लांबट आकाराची टिकली देखील महिलांच्या चेहऱ्यावर उठून दिसते. साडीवर मॅचिंग त्याच रंगाची गोल टिकली ही देखील उठून दिसते.
उभ्या आकाराची टिकली देखील तुम्ही लावू शकता. मराठमोळ्या पारंपारिक वेशभूषेवर तुम्ही चंद्रकोर टिकली लावू शकता.