Shreya Maskar
आवळामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे केस काळे करण्यास मदत करतात. खोबरेल तेल केसांना खोलवर मॉइश्चराइझ करते आणि मजबूत बनवते.
एका बाऊलमध्ये आवळा, कोमट खोबरेल तेल आवळ्याची पावडर मिसळा. पेस्ट थंड झाल्यावर केसांना लावा आणि १-२ तास तसेत राहू द्या. त्यानंतर, शॅम्पूने केस पूर्णपणे धुवा.
केस काळे करण्यासाठी कांद्याचा रस हा एक खूप प्रभावी उपाय आहे. तो केवळ केस काळे करत नाही तर टक्कल पडण्यावर आणि केसांच्या वाढीस देखील फायदेशीर आहे.
मिक्सरमध्ये कांदा वाटून त्याचा रस गाळून घ्या. नंतर त्यात थोडे मोहरीचे तेल घाला आणि किमान २० मिनिटे केसांना मालीश करा. अर्ध्या तासानंतर शॅम्पूने केस धुवा.
नैसर्गिकरित्या पांढरे केस काळे करण्यासाठी केसांना भृंगराज तेल लावू शकता. भृंगराज ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे, जी केस काळे करण्यास आणि त्यांना निरोगी बनवण्यास मदत करते.
भृंगराज तेल टाळूतील रक्तसंचार वाढते, ज्यामुळे केस मजबूत आणि दाट होतात. हे रात्रभर तसेच ठेवा आणि सकाळी कोमट पाण्याने धुवा.
कोरफडीमध्ये मेहंदी किंवा आवळा मिसळून ते केसांना लावा. ही पेस्ट अर्धा तास तशीच ठेवा आणि नंतर शॅम्पूने धुवा. यामुळे केस काळे होतील, तसेच ते मऊ, चमकदार आणि दाट बनतील.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.