बँक कर्मचाऱ्यांची चांदी! पगारात होणार भरघोस वाढ; अर्थ मंत्रालयाने नेमका काय आदेश दिला?वाचा सविस्तर

bank employee salary : बँक कर्मचाऱ्यांची चांदी होणार आहे. कारण त्यांच्या पगारात भरघोस वाढ होणार आहे.
bank employee salary update
bank employee salary Saam tv
Published On
Summary

बँक कर्मचाऱ्यांबाबत महत्वाची अपडेट

वेतन करारासाठी वाटाघाटी प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश

वेतनात सुधारणा १ नोव्हेंबर २०२७ सालापासून होणार लागू

बँक कर्मचार्‍यांच्या पगारवाढीबाबत महत्त्वाची माहिती हाती आली आहे. सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना १३ व्या द्विपक्षीय वेतन करारासाठी वाटाघाटीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तो करार १२ महिन्यात अंतिम करण्याचेही आदेश दिले आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकेचे कर्मचारी आणि अधिकारांच्या वेतनात सुधारणा ही १ नोव्हेंबर २०२७ पासून लागू होणार आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि विमा कंपन्यांच्या वित्तीय संस्थांकडून गरजेनुसार दर पाच वर्षांनी कर्मचाऱ्यांच्या पगारात सुधारणा केल्या जातात. यासाठी इंडियन बँक्स असोसिएशन कर्मचारी संघटना आणि युनियन्ससोबत वाटाघाटी करून वेतन करार करते.

bank employee salary update
केंद्र सरकारचा वेतनवाढीबाबत मोठा निर्णय; मनरेगा कामगारांना झटका

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रमुखांना वेतन सुधारणेसाठी वाटाघाटी सुरू करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश दिलेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना पगारात वाढ करण्यासाठी २० एप्रिल रोजी १२ महिन्यांत अंतिम प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. मागील कराराच्या वेळी अर्थ मंत्रालयाने इंडियन बँक असोसिएशनला वेतनासंदर्भातील वाटाघाटी निश्चित वेळेत पूर्ण करणे आणि सुधारित वेतनाची वेळेवर अंमलबजावणीसाठी सल्ला देण्यात आला होता.

मागील करारानुसार नियमांत आवश्यक सुधारणा लागू करण्यास विलंब झालाय. पुढील वेतन कराराच्या नियोजित तारखेआधी सुधारणा पूर्ण होतील, याची खात्री करण्यास सांगितले. बँकिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा झाल्यास त्यांचे मनोधैर्य वाढते, कारण ते भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानले जातात.

bank employee salary update
Layoffs 2026 : नोकर्‍या सांभाळा! प्रसिद्ध कंपनीत नोकरकपात; महिनाभरात 8000 कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार

तत्पूर्वी, सार्वजनिक क्षेत्रात बँकांनी आर्थिक वर्ष २५ साली विक्रमी नफा कमावला. या चालू वर्षातही नफा कमवावा. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी एकूण नफा आर्थिक वर्ष २३ साली १.०५ लाख कोटी इतका झाला होता. तर आर्थिक वर्ष २४ साली हाच नफा वाढून १.४१ लाख कोटी रुपये इतका झाला. तर आर्थिक वर्ष २५ मध्ये १.७८ लाख कोटी रुपये इतका झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com