

मेटा कंपनी पुन्हा नोकरकपात करणार
जवळपास १० टक्के कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढणार
जवळपास ८ हजार कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार
जगातील प्रसिद्ध मेटा कंपनी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात नोकरकपात करणार आहे. मेटा कंपनी २० मे २०२६ पर्यंत संपूर्ण जगभरातील ऑफिसमधील जवळपास १० टक्के कर्मचाऱ्यांना नोकरीतून कमी करणार आहे. पहिल्यात टप्प्यात ८ हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिले जाण्याची शक्यता आहे, असं वृत्त रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिले आहे.
मेटाचे सीईओ झुकरबर्ग हे कंपनीत आर्टिफिशयल इंटेलिजेंन्सचा उपयोग अधिक करण्यास सुरुवात करणार आहेत. झुकरबर्ग यांनी याआधी एआयमध्ये अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. कंपनीचे उत्पादन आणि अंतर्गत कामात देखील बदल करणार आहे. ऑटोमेशनला प्राधान्य देण्यासाठी नोकरकपात करणार आहे.
रिपोर्टनुसार, कंपनीत २० मे रोजी नोकरकपातीचा पहिला टप्पा असणार आहे. तर सूत्रांच्या माहितीनुसार, २०२६ वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत नोकरकपातीचा दुसरा टप्पा असेल. मेटा कंपनी नोकरकपात कशा प्रकारे करते, याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
टेक इंडस्ट्रीत ऑटोमेशन
नोकरकपात ही मेटाच्या टेक इंडस्ट्रीत असणार आहे. कंपन्या आता मॅन पॉवर ऐवजी एआयवर लक्ष केंद्रीत करत आहेत. 'मेटा'ची ही नोकरकपात सर्वात मोठी मानली जात आहे .
कंपनी २० मे २०२६ रोजी जवळपास ८००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केलं जाईल.
२०२६ वर्षाच्या दुसऱ्या साहामाहीत नोकरकपात केली जाईल. त्याची तारीख अद्याप समोर आलेली नाही.
जानेवारी २०२६ मध्ये Reality Labs डिव्हिजनमधून १० टक्के लोक म्हणजे १००० हून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलं.
रिपोर्टनुसार, एकूण २०२६ वर्षात २० टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केली जाऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.