Shruti Vilas Kadam
स्त्री हा २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला सुपरहिट हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची कथा ‘ओ स्त्री, कल आना’ या लोककथेवर आधारित आहे.
भूलभुलैया हा २००७ मध्ये प्रदर्शित झालेला बॉलिवूडमधील लोकप्रिय हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, विद्या बालन आणि शायनी आहुजा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले आहे.
गोलमाल अगेन हा २०१७ मध्ये प्रदर्शित झालेला लोकप्रिय हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटातअजय देवगण, परिणीती चोप्रा आणि तब्बू यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा ‘गोलमाल’ फ्रँचायझीचा चौथा भाग असून प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाला.
रुही हा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला बॉलिवूड हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर, राजकुमार राव आणि वरुण शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘स्त्री’ युनिव्हर्सचा भाग असलेला हा चित्रपट आहे.
लक्ष्मी हा २०२० मध्ये प्रदर्शित झालेला हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
स्त्री २ हा ‘स्त्री’ या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वेल असून २०२४ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत दिसतात.
भूत पोलीस सैफ अली खान आणि अर्जुन कपूरचा हा चित्रपट विनोदी शैलीत भुतांचा सामना करणाऱ्या दोन भावांवर आधारित आहे.