भीषण अपघात; चहा प्यायला निघालेल्या 7 मित्रांवर काळाचा घाला, 5 जणांचा करूण अंत

Seven Friends Went Out For Tea In Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील बलरामपूरमध्ये भीषण दुचाकी अपघात झाला. चहा पिण्यासाठी निघालेल्या सात मित्रांपैकी पाच जणांचा मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी झाले. घनदाट धुक्यामुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
UP ROAD ACCIDENT
UP ROAD ACCIDENTsaam tv
Published On: 

उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रात्री मित्रांसोबत चहा पिण्यासाठी घराबाहेर पडलेल्या सात तरुणांचा प्रवास भीषण अपघातामुळे संपला. दोन दुचाकींवरून उतरौला बाजारच्या दिशेने जात असताना घनदाट धुक्यामुळे हा अपघात झाला. या दुर्घटनेत पाच मित्रांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. एकत्र चहा पिण्यासाठी निघालेल्या मित्रांपैकी पाच जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. ही दुर्घटना बुधवारी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास उतरौला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अक्सीबडहरा गावाजवळ बलरामपूर-उतरौला मार्गावर घडली. सात तरुण दोन दुचाकींवरून चहा पिण्यासाठी उतरौला बाजारच्या दिशेने जात होते. त्यावेळी रस्त्यावर घनदाट धुके असल्याने दृश्यमानता कमी झाली होती.

UP ROAD ACCIDENT
माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव करणाऱ्या आमदाराचं निधन; राजकारणात हळहळ

दरम्यान, एका दुचाकीसमोर अचानक पादचारी आल्याने त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटले. दुचाकी घसरून रस्त्यावर पडली. मागून दुसऱ्या दुचाकीवरून येणारे मित्रही थांबले आणि रस्त्यावर पडलेल्या मित्रांना मदत करू लागले. याचवेळी दोन्ही दुचाकींची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील तरुण कित्येक फूट दूर फेकले गेले.

UP ROAD ACCIDENT
Maharashtra bribery case: मुख्याध्यापकच निघाला लाचखोर! शिक्षिकेकडं मागितले ५० हजार, ACB च्या जाळ्यात अडकला

अपघाताची भीषणता यावरून लक्षात येते की दोन्ही दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर दुचाकीवरील तरुण सुमारे 5 ते 10 फूट दूर फेकले गेले. अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. जखमी तरुणांना मदत करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच उतरौला पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात पोहोचवण्याची व्यवस्था केली. घटनास्थळावरून पोलिसांना अपघातग्रस्त दुचाकी आणि तुटलेले हेल्मेट आढळले आहेत. अपघात नेमका कसा झाला, याचा तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.