Sakshi Sunil Jadhav
आकाशात पाहिलं की कधी पांढरे शुभ्र ढग दिसतात, तर कधी काळेभोर ढग दिसतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ढग पांढरे आणि काळ्याच रंगाचे का असतात? चला जाणून घेऊयात.
बारीक ढग सुर्याच्या किरणांना चारही दिशांमध्ये पसरवण्याचे काम करतात. त्यामुळे तो पांढऱ्या आणि चमदार रंगाचे दिसतात.
ढग हे लाखो सूक्ष्म पाण्याचे थेंब आणि बर्फाच्या लहान कणांपासून तयार झालेले असतात.
सूर्यप्रकाशातील वेगवेगळ्या रंगांचे किरण ढगांमधून विखुरले जातात, त्यामुळे ढगांना पांढरा रंग प्राप्त झाल्यासारखा दिसतो.
जेव्हा ढग खूप दाट आणि जाड होतात, तेव्हा सूर्यप्रकाशाचा बराचसा भाग त्यांच्या खालच्या बाजूपर्यंत पोहोचत नाही.
पावसाळी ढगांमध्ये पाण्याचे प्रमाण आणि ढगांची जाडी वाढल्याने त्यांच्या खालच्या बाजूला कमी प्रकाश पोहोचतो आणि ते गडद दिसतात.
ढग जितके जाड आणि घनदाट असतात, तितका प्रकाश त्यांच्यातून कमी पार होतो. त्यामुळे ते अधिक गडद दिसतात.
सूर्याची दिशा, प्रकाशाची तीव्रता, ढगांची उंची आणि घनता यानुसार ढगांचा रंग बदलताना दिसतो.
ढगांचा रंग त्यांच्या जाडीवर, घनतेवर आणि सूर्यप्रकाश किती प्रमाणात त्यातून आरपार जातो यावर अवलंबून असतो. त्यामुळेच काही ढग पांढरे शुभ्र, तर काही काळेभोर दिसतात.