Wedding Lehenga Designs: घरातल्या लग्नसमारंभात दिसायचं आहे सगळ्यात हटके? मग हे 7 लेहंगा नक्की ट्राय करा

Shruti Vilas Kadam

हेवी एम्ब्रॉयडरी घागरा

घरातील लग्नासाठी हेवी एम्ब्रॉयडरी घागरा घालू शकता. यावर सुंदर नक्षीकाम, मोती आणि धाग्यांचे काम असते. मरून, गुलाबी किंवा निळ्या रंगातील घागरा खूप सुंदर दिसतो.

Wedding Lehenga Designs

सिल्क घागरा

पारंपरिक लुकसाठी सिल्क घागरा निवडा. यावर सुंदर बॉर्डर आणि पारंपरिक डिझाइन असते. लग्नाच्या मुख्य दिवशी हा घागरा छान दिसतो. यासोबत मोठे कानातले आणि नेकलेस घालू शकता.

Wedding Lehenga Designs

मिरर वर्क घागरा

मेहंदी किंवा संगीत समारंभासाठी मिरर वर्क घागरा घाला. यावर छोटे-मोठे आरसे लावलेले असतात. पिवळ्या, हिरव्या किंवा गुलाबी रंगातील घागरा खूप सुंदर दिसतो.

Wedding Lehenga Designs

फ्लोरल प्रिंट घागरा

हलका आणि सुंदर लुक हवा असेल तर फ्लोरल प्रिंट घागरा ट्राय करा. यावर फुलांची डिझाइन्स असतात. हळद किंवा मेहंदी समारंभासाठी पिवळ्या, गुलाबी आणि पीच रंगातील घागरा छान दिसतो.

Wedding Lehenga Designs

वेलवेट घागरा

रॉयल लुकसाठी वेलवेट घागरा निवडा. यावर सोनेरी रंगाचे सुंदर नक्षीकाम असते. मरून, हिरवा किंवा निळ्या रंगातील घागरा लग्न आणि रिसेप्शनसाठी छान दिसतो.

lehenga | pinterest

सिक्विन वर्क घागरा

संगीत किंवा रिसेप्शनमध्ये चमकदार दिसायचे असेल तर सिक्विन वर्क घागरा घाला. यावर चमकणाऱ्या छोट्या डिझाइन्स असतात. गोल्डन, सिल्व्हर आणि शॅम्पेन रंगातील घागरा सुंदर दिसतो.

Lehenga Selection

रफल डिझाइन घागरा

काहीतरी वेगळे ट्राय करायचे असेल तर रफल डिझाइन घागरा निवडा. यामध्ये घागऱ्याला वेगवेगळे थर असतात. त्यामुळे घागरा अधिक सुंदर आणि आकर्षक दिसतो. संगीत किंवा लग्नातील पार्टीसाठी हा चांगला पर्याय आहे.

Wedding Lehenga Designs

Style Old Shawl: आजीच्या जुन्या शॉलला द्या मॉडर्न टच! कॉलेज किंवा बाहेर जाण्यासाठी ट्राय करा ५ फॅशनेबल स्टाइल्स

Style Old Shawl | Saam Tv
येथे क्लिक करा