Shruti Vilas Kadam
जुन्या शॉलला नवीन लुक देण्यासाठी कमरेला बेल्ट लावा. दोन्ही खांद्यांवर शाल घेऊन तिची टोके समोर ठेवा. त्यानंतर कमरेला बेल्ट लावा. जीन्स, टॉप किंवा कुर्तीसोबत ही स्टाइल छान दिसते.
जुनी शॉल स्कार्फप्रमाणेही वापरता येते. यासाठी शॉल दुमडा आणि गळ्याभोवती गुंडाळा. दोन्ही टोके समोर ठेवा. स्वेटर किंवा जीन्ससोबत ही स्टाइल छान दिसेल.
पार्टी किंवा लग्नसमारंभासाठी शॉल एका खांद्यावर घ्या. शालीचे एक टोक खांद्यावर ठेवा आणि दुसरे टोक मोकळे सोडा. शॉल खाली पडू नये म्हणून पिन किंवा ब्रोच लावा. साडी आणि ड्रेसवर ही स्टाइल सुंदर दिसते.
शॉल दोन्ही खांद्यांवर पांघरा आणि तिची टोके दोन्ही बाजूंना मोकळी सोडा. गळ्याजवळ ब्रोच लावा. यामुळे शॉलला केपसारखा लुक मिळतो. जीन्स आणि स्वेटरसोबत ही स्टाइल छान दिसते.
शॉल दोन्ही खांद्यांवर घ्या. त्यानंतर तिची दोन्ही टोके समोर एकमेकांवर क्रॉस करा. गरजेनुसार पिन लावून शॉल व्यवस्थित ठेवा. कुर्ती, सलवार सूट किंवा ड्रेसवर ही स्टाइल छान दिसते.
जुन्या शॉलचा वापर श्रगप्रमाणे करता येतो. शॉल दोन्ही खांद्यांवर घ्या आणि तिचा कपडा दोन्ही बाजूंना हातांजवळ पसरवा. यामुळे तुम्हाला श्रगसारखा लुक मिळेल. टॉप आणि जीन्ससोबत ही स्टाइल ट्राय करा.
पारंपरिक लुक हवा असेल तर साडी किंवा कुर्तीसोबत शाल नेसा. साडीच्या रंगाला शोभेल अशी शॉल निवडा. शॉलला सुंदर ब्रोच लावा. यामुळे तुमचा साधा लुकही सुंदर आणि आकर्षक दिसेल.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही.