Riteish - Raja Shivaji Collection : वीकेंडला बॉक्स ऑफिसवर 'राजा शिवाजी'ची जादू; शनिवारी छप्परफाड कमाई, कलेक्शनचा आकडा वाचून बसेल धक्का

Raja Shivaji Box Office Collection Day 16 : रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' चित्रपट लवकरच १०० कोटींचा टप्पा पार करणार आहे. चित्रपटाने तिसऱ्या वीकेंडला बक्कळ कमाई केली. कलेक्शन जाणून घेऊयात.
Raja Shivaji Box Office Collection Day 16
Riteish - Raja Shivaji CollectionSAAM TV
Published On
Summary

'राजा शिवाजी' चित्रपट १ मे ला थिएटरमध्ये रिलीज झाला.

'राजा शिवाजी' हा छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित ऐतिहासिक चित्रपट आहे.

'राजा शिवाजी' चित्रपटातील गाणी अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केली आहेत.

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाची सर्वत्र हवा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट १ मे (महाराष्ट्र दिन) ला रिलीज झाला आहे. चित्रपटाने दोन आठड्यात बक्कळ कमाई केली आहे. चित्रपट आता लवकरच १०० कोटींचा टप्पा पार करणार आहे. 'राजा शिवाजी' हा रितेश देशमुख आणि जिनिलियाच्या करिअर मधील सर्वात मोठा चित्रपट आहे. या प्रोजेक्टसाठी रितेशने तब्बल १० वर्ष मेहनत घेतली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'राजा शिवाजी' चित्रपट १०० कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. हा चित्रपट रिलीज होऊन आता अर्धा महिना पूर्ण झाला आहे. चित्रपटाचे १६ व्या दिवसाचे कलेक्शन वाचूया.

'राजा शिवाजी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस १६

'राजा शिवाजी' या ऐतिहासिक चित्रपटाने पहिल्या आठवड्यात ५२.६५ कोटी रुपयांच्या कमाई केली. दुसऱ्या आठवड्यात २४.३० कोटी रुपये कमावले. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने १६ व्या दिवशी २,१७२ शोजमधून २.७० कोटी रुपयांची कमाई केली. यापैकी, मराठी आवृत्तीने २.३० कोटी रुपये जमा केले, तर हिंदी आवृत्तीने ०.४० कोटी रुपयांची कमाई केली. आतापर्यंत चित्रपटाची भारतातील एकूण ग्रॉस कमाई ९६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे आणि भारतातील एकूण नेट कमाई ८१.१० कोटी रुपये झाली आहे.

  • पहिला आठवडा (हिंदी): १६.४० कोटी रुपये; (मराठी): ३६.२५ कोटी रुपये

  • ८ वा दिवस (हिंदी): ०.७० कोटी रुपये; (मराठी): २.५० कोटी रुपये

  • ९ वा दिवस (हिंदी): १.३२ कोटी रुपये; (मराठी): ४.२५ कोटी रुपये

  • १० वा दिवस (हिंदी): १.८० कोटी रुपये; (मराठी): ५ कोटी रुपये

  • ११ वा दिवस (हिंदी): ०.५० कोटी रुपये; (मराठी): १.९० कोटी रुपये

  • १२ वा दिवस (हिंदी): ०.६५ कोटी रुपये; (मराठी): १.८५ कोटी रुपये

  • १३ वा दिवस (हिंदी): ०.५० कोटी रुपये; (मराठी): १.४० कोटी रुपये

  • १४ वा दिवस (हिंदी): ०.५० कोटी रुपये; (मराठी): रु. 1.40 कोटी

  • दिवस 15 (हिंदी): 0.20 कोटी रुपये; (मराठी): रु. 1.25 कोटी

  • एकूण: 81.10 कोटी रुपये

'राजा शिवाजी' स्टारकास्ट

'राजा शिवाजी' चित्रपटात हिंदीसोबत मराठी स्टारकास्टही पाहायला मिळाली आहे. चित्रपटात जिनिलिया देशमुख सईबाईंच्या भूमिकेत झळकली आहे. तर रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. महाराष्ट्राच्या या लाडक्या जोडीला पुन्हा एकत्र पाहून चाहते खूपच खुश झाले आहेत. तसेच या चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, सचिन खेडेकर, विद्या बालन, फरदीन खान, भाग्यश्री, जेनेलिया देशमुख,सिद्धार्थ जाधव असे अनेक कलाकार झळकले आहेत.

Raja Shivaji Box Office Collection Day 16
Famous Actor Death : तेजस्वी तारा काळाच्या पडद्याआड, प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; मनोरंजन विश्वावर शोककळा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com