

तिसऱ्या अपत्यासाठी ३० हजार रुपये आणि चौथ्या अपत्यासाठी ४० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा.
ही योजना आंध्र प्रदेश सरकारने सुरू केली आहे.
मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू सरकारने ही घोषणा केली आहे.
आंध्र प्रदेशमधील राज्य सरकारनं राज्यातील जनतेसाठी एक अनोखी योजना सुरू केली आहे. ही योजना ऐकून तुमच्या भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाहीत. लोकसंख्या वाढतेय म्हणून देशातील सरकार चिंतेत पडलंय दुसरीकडे चंद्रबाबू नायडू सरकारनं चार अपत्य झालेल्यांना आर्थिक साहाय्य करण्याची योजना सुरू केली आहे. राज्य सरकार आता तिसरं अपत्य झाल्यास ३० हजार आणि चौथे बाळ झाल्यास नागरिकांना ४० हजार रुपयांची रोख आर्थिक मदत सरकार करणार आहे. (Chandrababu Naidu Government Launches Unique Childbirth Incentive Scheme)
नरसन्नपेटा येथे आयोजित 'सुवर्ण आंध्र-स्वच्छ आंध्र' कार्यक्रमात बोलताना, मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी राज्यातील घटत्या लोकसंख्या वाढीबद्दल चिंता व्यक्त केली आणि मुलांना राष्ट्राची संपत्ती म्हणून पाहिले पाहिजे, ओझे म्हणून नव्हे, असे म्हणालेत.
लोकसंख्या वाढीस प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सरकार कुटुंबांना त्यांच्या तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठी ३०,००० रुपये आणि चौथ्या अपत्याच्या जन्मासाठी ४०,००० रुपये देईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. "या निर्णयावर अनेकदा विचार केला आहे." आधी आपण कुटुंब नियोजनासाठी काम केले.
पण आज पुन्हा एकदा, मुले हीच आपली संपत्ती आहेत आणि आपल्या मुलांच्या सर्वोत्तम हितासाठी काम करणे आपल्या सर्वांसाठी अत्यावश्यक आहे. हीच गोष्ट तुम्हा सर्वांना सांगायची आहे. म्हणून मी आणखी एक निर्णय घेतला आहे. तो मी या महिन्यात तुम्हाला सांगत असून तिसऱ्या मुलाच्या जन्मानंतर आम्ही तात्काळ ३०,००० रुपये देऊ. चौथ्या मुलासाठी आम्ही ४०,००० रुपये देऊ, असं मुख्यमंत्री म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.