Ladki Bahin Yojana: खूशखबर! लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात दोन महिन्याचा हप्ता जमा; तुम्हाला किती रुपये मिळाले १५०० की ३०००?

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचे हप्ते जमा होण्यास सुरुवात झाली आहे. एका दिवसापूर्वी फक्त एका महिन्याचे पैसे जमा झाले होते. आता मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे बँक खात्यात जमा होत आहेत.
Ladki Bahin Yojana Update:
Maharashtra government has started depositing March and April installments under Ladki Bahin Yojana.Google
Published On
Summary
  • लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन महिन्यांचे हप्ते जमा होण्यास सुरुवात.

  • काही महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा झाल्याचे मेसेज.

  • मार्च आणि एप्रिल महिन्यांचे पैसे लाभार्थींना मिळणार.

सरकारसाठी गेमचेंजर ठरलेली योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. फेब्रुवारीपासून हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाभार्थी महिलांना तब्बल दोन महिन्याचे पैसे खात्यावर जमा होत आहेत. लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात गुरुवारी मार्च महिन्याचा हप्ता जमा करण्यात आला होता. आता आज शुक्रवारी पुन्हा १५०० रुपयांचा हप्ता जमा झाला आहे. यामुळे योजनेच्या लाभार्थ्यांना मार्च आणि एप्रिल महिन्याचा पैसे मिळणार आहेत. (Ladki Bahin Yojana two month installment credited in bank account)

Ladki Bahin Yojana Update:
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना खुशखबर! बँक खात्यात १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात; तुमच्या खात्यात आले का पैसे? लगेच करा चेक

महाराष्ट्र सरकारच्यावतीनं लाडक्या बहिणींच्या खात्यात काल मार्च महिन्याची रक्कम जमा करण्यात आली होती. आज काही लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचे १५०० रुपये जमा झाल्याचे मेसेज येत आहेत. लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन दिवसात ३००० रुपये जमा झालेत. यामुळे फेब्रुवारीपासून पैशांच्या प्रतिक्षेत असलेल्या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Ladki Bahin Yojana Update:
PAN कार्डधारकांसाठी मोठा बदल! पैसे काढण्यासाठी नव्या अटी अन् नवे नियम लागू

फेब्रुवारीच्या हप्त्याची रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यात २४ मार्चला जमा करण्यात आली होती. त्यानंतर लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या रकमेसाठी वाट पाहत होते. अखेर राज्य सरकारकडून १४ आणि १५ मे रोजी अनुक्रमे मार्च आणि लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम वर्ग करण्यात आली आहे.

लाडक्या बहिणींची संख्या घटली आहे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारनं लोकसभेच्या निवडणुकीनंतर सुरू केली होती. या योजनेची सुरुवात जुलै २०२४ पासून करण्यात आली आहे. तेव्हापासून दरमहा लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम जमा केली जाते. या योजनेचा निकष निश्चित करताना शासनानं लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक असू नये असं निश्चित केले होते.

याशिवाय इतर अटी देखील या योजनेसाठी निश्चित करण्यात आल्या. त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र महिलांना मिळावा यासाठी शासनाकडून ई केवायसी प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. त्यानंतर काही महिलांनी शासकीय नोकरी संदर्भातील चुकीचे पर्याय निवडल्यानं त्यांना दुरुस्तीसाठी 30 एप्रिलपर्यंत संधी देण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com